बालगंधर्वातील स्वच्छतागृहाची अवस्था भयानक!; हेमंत ढोमेची फेसबुक पोस्ट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

तेथील स्वच्छतागृहात 'माणुस काय डास सुद्धा जायला घाबरत असावेत!' अशा शब्दात हेमंतने बालगंधर्वमधील अस्वच्छतेवर बोचरी टिका केली.

सांस्कृतिक सभागृहांच्या अवस्थेबाबत सगळीकडेच टिका केली जाते. तेथील गैरसोय आणि अस्वच्छता यांना कलाकारही कंटाळले आहेत. नुकताच त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. अभिनेता हेमंत ढोमे याने पुण्यातील बालगंधर्व रंगंमंदिरातील अस्वच्छतेचा अनुभव फेसबुक पोस्टद्वारे शेअर केला आहे. 

अभिनेता हेमंत ढोमे 'घरात मॅरीड, बाहेर बॅचलर' या नाटकाच्या प्रयोगानिमित्त पुण्यात आला होता. या नाटकाचा दोन महिन्यांपुर्वी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे पहिला प्रयोग झाला होता. तेव्हा नाटकाची टीम बालगंधर्वमध्ये आली असता त्यांना तेथील स्वच्छतागृहांबाबत वाईट अनुभव आला होता. तेथील स्वच्छतागृहात 'माणुस काय डास सुद्धा जायला घाबरत असावेत!' अशा शब्दात हेमंतने बालगंधर्वमधील अस्वच्छतेवर बोचरी टिका केली.

बालगंधर्वमधील स्वच्छतागृहाच्या अस्वच्छेता बघितल्यावर तुम्हालाही ओकारी येईल, असे हेमंतने पोस्ट मध्ये म्हटले आहे. तसेच 'आम्ही म्हातारे झाल्यावर नक्की सांगु... आम्ही रंगभुमीचा अस्वच्छ काळ पाहिला!...' असे उपहासात्मक लिहीत हेमंतने नाट्यगृहांच्या अवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे.    

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Hemant Dhome Criticized By Facebook Post For Dirtiness Of Toilets In Balgandharva Rangmandir