'स्माईल प्लीज'मधून विक्रम फडणीस घेऊन येताहेत भावनिक प्रवास

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 March 2019

ह्रतिक म्हणाला, 'विक्रम एक उत्तम दिग्दर्शक आहे. स्वतःला कामात पूर्णपणे झोकून देण्याची त्याची जी सवय अफलातून आहे. भावनिकता आणि व्यावहारिकता याचा सुंदर मेळ त्याच्या चित्रपटात अनुभवायला मिळतो. विक्रमचा 'स्माईल प्लीज' हा चित्रपट प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणेल.'

मुंबई : सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'हृदयांतर' सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक विक्रम फडणीस आणखी एक चित्रपट घेऊन येत आहे. 

'स्माईल प्लीज' असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचे उद्घाटन बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनच्या हस्ते नुकताच झाले. यावेळी मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर, प्रसाद ओक, अदिती गोवित्रीकर, तृप्ती खामकर या कलाकारांनी चित्रपटातील आपापल्या पात्रांची ओळख अभिनयाद्वारे करून दिली. याप्रसंगी अमिषा पटेल, झरीन खान, रॉनीत रॉय, किआरा अडवाणी, श्वेता बच्चन-नंदा अशा बॉलिवूडमधील आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी उपस्थित राहून विक्रम फडणीस आणि 'स्माईल प्लीज' चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. 

smile please

यावेळी ह्रतिक म्हणाला, 'विक्रम एक उत्तम दिग्दर्शक आहे. स्वतःला कामात पूर्णपणे झोकून देण्याची त्याची जी सवय अफलातून आहे. भावनिकता आणि व्यावहारिकता याचा सुंदर मेळ त्याच्या चित्रपटात अनुभवायला मिळतो. विक्रमचा 'स्माईल प्लीज' हा चित्रपट प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणेल.'

विक्रम फडणीस सांगतात, 'या कथेत मला कुठेतरी माझ्या आईचा भास होतो आणि म्हणूनच तो माझ्या मनाच्या खूप जवळचा आहे. चित्रपटासाठी माझ्या निकटवर्तीयांनी मला खूप मदत केली. मला आशा आहे की, या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या मनातील 'स्माईल प्लीज'ची फ्रेम नक्कीच बहरेल.'

या चित्रपटाच्या निमित्ताने विक्रम आणि मुक्ता पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. हॅशटॅग फिल्म स्टुडिओच्या निशा शाह आणि क्रित्यावत प्रॉडक्शनच्या सानिका गांधी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. 'स्माईल प्लीज' या चित्रपटाला रोहन-रोहन या जोडीचे संगीत लाभणार असून मंदार चोळकर चित्रपटातील गाण्यांना शब्दबद्ध करणार आहेत. तर चित्रपटाचे छायाचित्रण मिलिंद जोग करणार आहेत.

smile please

smile please

smile please

smile please

smile please

smile please


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Hrithik Roshan gives the first clap for Vikram Phadnis second Marathi Film Smile Please