इलियाना करणार होती आत्महत्या, 'त्या' आजाराविषयी केला खुलासा

वृत्तसंस्था
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

एकेकाळी इलियानाने एका आजाराचा सामना केला होता. त्याचकाळात ती नैराश्यातदेखील गेली होती.

मुंबई : बॉलिवूडमधील अभिनेत्री इलियाना डिक्रुज हिचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. इलियानाने आपला 34 वा वाढदिवस अगदी 'बोल्ड' अंदाजात साजरा केला. इलियानाने जिथे वाढदिवस साजरा केला त्या जागेचा खुलासा केला नसला तरी मात्र त्यावेळचे 'हॉट' फोटो शेअर केले आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. 

मात्र एकेकाळी इलियानाने एका आजाराचा सामना केला होता. त्याचकाळात ती नैराश्यातदेखील गेली होती. तिच्या आयुष्यातील धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे. बऱ्याच काळानंतर इलियानाने या गोष्टीचा खुलासा करत, तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एक भाग सर्वांसमोर आणला आहे. 

इलियानाचा जन्म मुंबईच्या माहिममध्ये एका रोमन कॅथलिक परिवारात झाला. इलियानाने अनेक दाक्षिणात्य सिनेमे केले. मात्र 2012 मध्ये अनुराग बसू च्या 'बर्फी' या चित्रपटासह बॉलिवूडमध्ये तिनं पदार्पण केलं. त्यानंतर फटा पोस्टर निकला हिरो, हॅपी एंडिंग, मे तेरा हिरो, रुस्तम, बादशाहो आणि रेड असे अनेक कॉमेडीपासून अॅक्शपर्यंत सुपरहिट चित्रपट तिने केले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

When you’re trying to be hot but all you gots a blocked nose @rohanshrestha 

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official) on

मात्र याचकाळात तिला  बॉडीडिसमॉर्फिक डिसऑर्डर या आजाराने ग्रासलं होतं. एवढचं नाही तर तिने याचकाळात नैराश्य म्हणजे 'डिप्रेशन' चाही सामना केला. तो काळ शारिरीक आणि मानसिकरित्या त्रासदायक असल्याचं ती सांगते. आत्महत्येचा टोकाचा विचारदेखील अनेकदा तिच्या मनात आला. आत्महत्येचा विचार वारंवार येत असल्याने आजाराशी दोन हात करणे तिच्यासाठी खडतर झाले होते. 

Image may contain: 3 people, people smiling, people standing, night and indoor

त्यानंतर मात्र मोठ्या जिद्दीने, औषधोपचार आणि मानसोपचार घेऊन तिने यावर मात केली. 'देवदासु' या तेलुगू चित्रपटाने 2006 मध्ये आपल्या करीअरला सुरुवात करणाऱ्या इलियानाला दक्षिणेच्या फिल्मफेयर चा बेस्ट फीमेल डेब्यू हा पुरस्कार मिळाला होता. तिच्या अप्रतिम अभिनसाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. 'पागलपंती' या आगामी कॉमेडी चित्रपटातून इलियाना लवकरच झळकणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Ileana DCruz talks about her depression and thought of suicide