Bipasha Basu: करण सिंग ग्रोव्हरला 2007 मध्येच बिपाशाशी करायचं होतं लग्न, थ्रोबॅक व्हिडिओवर अभिनेत्रीने दिली अशी प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

karan singh grover and bipasha basu

Bipasha Basu: करण सिंग ग्रोव्हरला 2007 मध्येच बिपाशाशी करायचं होतं लग्न, थ्रोबॅक व्हिडिओवर अभिनेत्रीने दिली अशी प्रतिक्रिया

करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसू हे प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. करण आणि बिपाशाने 2015 मध्ये डेट केले होते आणि 2016 मध्ये लग्न केले होते, परंतु तुम्हाला माहिती आहे का की करणने 2007 मध्येच घोषणा केली होती की तो बिपाशाशी लग्न करू इच्छित आहे. फॅन पेजने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो असे म्हणताना दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर एक थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये करण सिंग ग्रोव्हर बिपाशा बसूसोबत लग्नाबद्दल बोलताना दिसत आहे. करण म्हणतो, “बिपाशा क्रेझ! बिपाशासारखी मुलगी मिळाली तर आयुष्य सेट होईल". हा व्हिडिओ अभिनेत्याच्या 'दिल मिल गए' शोच्या एका सीनमधील आहे, ज्यामध्ये तो आपल्या हीरोइनला जळवण्यासाठी असे बोलत आहे. शोमध्ये त्याने डॉ. अरमानची भूमिका साकारली होती.

करण सिंग ग्रोवरचा हा थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ करणचा को-स्टार अयाज खानची पत्नी जन्नतने तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला होता आणि त्यानंतर बिपाशानेही तो तिच्या इन्स्टावर री-शेयर केला होता. यासोबतच तिने अनेक हसणारे इमोजीही टाकले आहे.

bipasha basu

bipasha basu

श्रद्धा निगम आणि जेनिफर विंगेट यांच्या घटस्फोटानंतर करणला बिपाशा बसूमध्ये तिसऱ्यांदा प्रेम सापडलं. 'अलोन' चित्रपटाच्या सेटवर करणने बिपाशाला भेटला होता. शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. वर्षभर डेटिंग केल्यानंतर 2016 मध्ये त्यांनी धूमधडाक्यात लग्न केले. आता दोघेही एका मुलीचे पालक आहेत. त्यांच्या लाडकीचे नाव देवी आहे.