Karan Singh Grover Birthday: या कोरिओग्राफरमुळे करणने दहा महिन्यांतच तोडले लग्न अन् मग... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

karan singh grover

Karan Singh Grover Birthday: या कोरिओग्राफरमुळे करणने दहा महिन्यांतच तोडले लग्न अन् मग...

करण सिंग ग्रोव्हर हा असा अभिनेता आहे, ज्याने आपल्या अभिनय कारकिर्दीत एकापेक्षा जास्त टीव्ही शो केले आहेत आणि काही चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. पण त्याच्या प्रोफेशनल लाईफपेक्षाही तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला. त्याने दोन अयशस्वी विवाह केले आणि नंतर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशाशी लग्न केले.

करण सिंग ग्रोव्हरचे वैयक्तिक आयुष्य एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. करण सिंग ग्रोव्हर 24 फेब्रुवारीला त्याचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे आणि या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्याच्या एका अफेअरबद्दल सांगणार आहोत ज्याने त्याच्या पहिल्या लग्नाला एक वर्षही टिकू दिले नाही.

करण सिंग ग्रोव्हर एक उत्कृष्ट अभिनेता आहे आणि त्याने आपल्या अनेक टीव्ही शोमधून हे सिद्ध केले आहे. पण करण त्याच्या कामापेक्षा लग्न आणि घटस्फोटामुळे जास्त चर्चेत आहे. करण सिंग ग्रोवरने तीन लग्ने केली आहेत, त्याने पहिले लग्न टीव्ही अभिनेत्री श्रद्धा निगमशी केले आणि 10 महिन्यांतच त्यांचं लग्न मोडलं आणि त्यामागचे कारण होते करण सिंग ग्रोवरचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. करण सिंग ग्रोवरने २००८ मध्ये टीव्ही अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत लग्न केले.

दोघांनीही मोठ्या धूमधडाक्यात लग्न केलं. लग्नानंतर काही महिन्यांतच दोघांमध्ये तणावाच्या बातम्या येऊ लागल्या. 'झलक दिखला जा सीझन 3' दरम्यान, करणची त्याच्या कोरिओग्राफरसोबत जवळीक वाढू लागली आणि त्या कोरिओग्राफरचे नाव होते निकोल अल्वारेस. निकोलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली खुद्द करणनेच पत्नीसमोर दिली. हे लग्न वर्षभरही टिकू शकले नाही आणि 10 महिन्यांतच श्रद्धा आणि करणचा घटस्फोट झाला.

करण सिंग ग्रोवरच्या सध्याच्या पत्नीबद्दल सांगायचे तर, या अभिनेत्याला बिपाशा बसूमध्ये खरे प्रेम मिळाले. दोघांची पहिली भेट 'अलोन'च्या सेटवर झाली होती. अवघ्या वर्षभराच्या डेटिंगनंतर करण आणि बिपाशाने २०१६ मध्ये लग्न केले. आज दोघेही सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. त्यांना एक मुलगी देखील आहे, तिचे नाव देवी आहे. दोघेही मीडियासमोर एकमेकांच्या जवळ येण्याची एकही संधी सोडत नाहीत.