कार्तिक करेल ऐश्वर्या राय बच्चन सोबत रोमान्स

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

दिग्दर्शक रोहन सिप्पी हे ऐश्वर्या राय बच्चन सोबत लवकरच एक थ्रिलर सिनेमा बनविण्याच्या तयारीत आहेत.

'सोनू के टिटू की स्विटी'ने 100 करोडची कमाई केली आणि बॉलिवूडचा चार्मिंग बॉय कार्तिक आर्यन याच्याकडे बॉलिवूडच्या नजरा पुन्हा उंचावल्या आहेत. कार्तिकचा जादू तरुणाईच्या मनात तर घर करुन आहेच. पण लवकरच कार्तिकला त्याचे चाहते एका विश्वसुंदरीसोबत बिग स्क्रिन शेअर करताना बघतील.

दिग्दर्शक रोहन सिप्पी हे ऐश्वर्या राय बच्चन सोबत लवकरच एक थ्रिलर सिनेमा बनविण्याच्या तयारीत आहेत. सुत्रांनुसार, सिप्पी या सिनेमासाठी यांनी कार्तिकची भेटही घेतली आहे. या सिनेमाचे नाव सध्यातरी ठरविले गेलेले नाही.

ऐश्वर्या राय आणि रोहन सिप्पी 15 वर्षानंतर एकत्र कामि करतील. या आधी त्यांनी 'कुछ ना कहो' सिनेमासाठी एकत्र काम केले होते. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Actor Kartik aryan and Aishwarya Ray will work together in Rohan Sippis next