'तारक मेहता...' फेम कवी कुमार यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

प्रेक्षकांना सतत हसत ठेवणारे कवी कुमार आझाद हे मुळचे बिहारचे रहिवासी होते. कवी कुमार हे त्यांच्या वाढत्या वजनाने त्रस्त होते.

मुंबई - टी. व्ही. वर 'तारक मेहता का उलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून डॉ. हंसराज हाथी ही भूमिका साकारणारे अभिनेता कवी कुमार आझाद यांचे ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यांना मीरा रोड येथील वॉकहार्टस् हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.  

प्रेक्षकांना सतत हसत ठेवणारे कवी कुमार आझाद हे मुळचे बिहारचे रहिवासी होते. कवी कुमार हे त्यांच्या वाढत्या वजनाने त्रस्त होते. 2010 साली त्यांनी शस्त्रक्रिया करुन ऐंशी किलो वजन कमी केले होते. मालिकांबरोबरच आमीर खानचा 'मेला' आणि 'फंटूश' या सिनेमातही त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांच्या या अचानक जाण्यामुळे 'तारक मेहता का...' मालिकेचे शुटींग थांबविण्यात आले आहे. मालिकेला नुकतीच दहा वर्षे पुर्ण झाल्याच्या आनंदात मिटींगचे आयोजन करण्यात आले आहे. पण त्याआधीच कवी कुमार यांनी जगातून एक्झिट घेतली. 

kavi kumar aazad
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Kavi Kumar Azad Passes Away

टॅग्स