रियाच्या मुलाखतीनंतर पहिल्यांदाच सुशांतचा मित्र महेश शेट्टीने या प्रकरणात दिली प्रतिक्रिया

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 29 August 2020

रियाच्या मुलाखतीनंतर आता सुशांतचा मित्र आणि अभिनेता महेश शेट्टीने पहिल्यांदाच या प्रकरणात त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई- अभिनेत्री रिया चक्रवर्ती सध्या सुशांत मृत्यु प्रकरणात अनेक आरोप सहन करत आहे. शुक्रवारी सीबीआयने जवळपास साडेदहा तास तिची चौकशी केली. सीबीआय चौकशीला सामोरं जाण्याच्या आधी रियाने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिसी होती. त्यात तिने अनेक प्रश्नांची उत्तर देतं काही महत्वाच्या गोष्टींचा खुलासा देखील केला. तसंत सुशांतच्या कुटुंबावर अनेक आरोप लावले. तिच्या या मुलाखतीनंतर आता सुशांतचा मित्र आणि अभिनेता महेश शेट्टीने पहिल्यांदाच या प्रकरणात त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा: 'ब्लॅक पँथर' फेम अभिनेता चॅडविक बोसमनचं निधन

रियाने तिच्या मुलाखतीत सांगितलं होतं की सुशांत तिला भेटण्याआधीपासूनंच मानसिक आजाराने आणि नैराश्याने ग्रस्त होता. सोबतंच सुशांतच्या बहीणीवर शारिरिक अत्याचाराचा आरोप देखील लावला. या सगळ्या आरोपांवर सुशांतचा मित्र महेश शेट्टीने इंस्टाग्रामवरच्या माध्यमातून त्याची प्रतिक्रिया दिली आहे. महेश शेट्टीने रियाच्या मुलाखतीनंतर त्याच्या इंस्टास्टोरीमध्ये लिहिलंय, 'लोक इथे स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करु शकतात अखेर सत्याचाच विजय होईल. मात्र आपली प्रतिष्ठा गमवू नका आणि गेलेल्या माणसाला बदनाम करु नका.' महेश शेट्टीने यात कोणाचंही नाव घेतलेलं नाही. मात्र ही पोस्ट रियाच्या मुलाखतीसोबत जोडली जात आहे. सोशल मिडियावर ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

रियाने तिच्या मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. तिने म्हटलंय, 'सुशांत मानसिक आजाराने ग्रस्त होता. यामागे एक कारण होतं त्याच्या आईचं लवकर या जगातून निघून जाणं. सुशांत त्याच्या आईवर खूप प्रेम करत होता. मला असं वाटतं हे त्याच्या नैराश्याचं एक कारण होतं कारण तो त्याच्या आईशिवाय जगू शकत नव्हता.' याव्यतिरिक्त रियाने म्हटलंय की 'सुशांतचे त्याच्या कुटुंबाशी आणि खासकरुन त्याच्या वडिलांशी चांगले संबंध नव्हते. तो त्याच्या वडिलांसोबत ५ वर्ष बोलला नव्हता आणि त्यांना भेटला नव्हता.' या सगळ्या आरोपांवर सुशांतचा मित्र महेश शेट्टीने पहिल्यांदाच त्याची प्रतिक्रिया दिली आहे.   

actor mahesh shetty reation after rhea chakraborty interviews  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor mahesh shetty reation after rhea chakraborty interviews