'इतक्या शिव्या तर रियल लाईफमध्ये कधीच दिल्या नाहीत'

त्याची ती भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती.
the family man season 2
the family man season 2Team esakal

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता मनोज वाजपेयी (actor manoj bajpayee) याची द फॅमिली मॅन (the family man 2 ) चा सीझन 2 हा येत्या आठवड्यात रिलीज होणार आहे. यानिमित्तानं त्यानं त्या मालिकेबद्दलच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. आपण रियल लाईफमध्ये ज्या भाषेचा वापर करत नाही अशी भाषा या मालिकेत आपल्याला वापरावी लागली. असे त्यानं यावेळी सांगितले आहे. त्या मालिकेची गरज आणि निर्माते आणि दिग्दर्शक यांची अशी इच्छा होती. त्याशिवाय माझ्या भूमिकेला न्याय देता आला नसता असे त्यानं सांगितले आहे. (actor manoj bajpayee talks about abuses in the family man 2 says he never used in real life)

द फॅमिली मॅन च्या (the family man 2 ) दुस-या सीझनमध्ये मनोजनं इंटेलिजिन्स (intelligence officer) एजंटची भूमिका केली आहे. तो साकारत असलेल्या भूमिकेचे नाव श्रीकांत असे आहे. एका मध्यमवर्गीय कुटूंबाच्या या मालिकेत त्याच्या भूमिकेचे कौतूक झाले होते. त्याची ती भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. जेव्हा या मालिकेचा दुसरा भाग तयार होत होता तेव्हा त्याच्या चित्रिकरणाच्यावेळी मला माझ्या संवादात अनेक बदल करावे लागले. त्यात सर्वात महत्वाचा बदल होता. संवादाचा. आताच्या सीझनमध्ये माझ्या तोंडी अनेक शिव्या आहेत. असे मनोजनं सांगितलं आहे .

आपण अशा प्रकारचे संवाद बोलु शकतो यावरुन त्याला आश्चर्य वाटले आहे. वास्तविक जीवनात शिव्यांचा वापर फार कमी वेळा केल्याची आठवण तो सांगतो. फॅमिली मॅनच्या ट्रेलरमध्ये श्रीकांत त्याची पत्नी सुचित्रा (प्रियमणि) (priyamani) एका ठिकाणी समुपदेशन घेताना दाखवले आहेत. त्यानंतर तो थेरपिस्ट त्याला एक इंग्लिश संवाद म्हणायला लावतात. तेव्हा श्रीकांत नाराज होतो, जो जिता वही सिकंदर असे बोलल्यानंतर आपल्याला बीपचा आवाज येतो. त्याठिकाणी शिव्यांचा वापर केला आहे.

the family man season 2
त्या रात्री नेमकं काय झालं? जामिनावर सुटलेल्या करणचं स्पष्टीकरण
the family man season 2
सलमानविरोधात केआरकेला गोविंदाचा पाठिंबा?

बॉलीवूड़ हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीत मनोज सांगतो, फॅमिली मॅनमध्ये जशा शिव्या दिल्या आहेत. त्या वास्तविक जीवनात मी काही देत नाही. या मालिकेच्या निमित्तानं मला त्या द्याव्या लागल्या आहेत. त्याचे कारण त्या मालिकेची गरज होती. असे मनोजनं सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com