'यार,अमेरिका से जलन हो रही है, 4 साल बाद हम भी देख लेंगे' 

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 8 November 2020

जिशानने याप्रकारचे वक्तव्य़ करुन नेमकं कुणाला लक्ष्य केलं आहे, असा प्रश्न त्याला काही नेटक-यांकडून विचारला जात आहे. बाकी काही का असेना यासगळ्या परिस्थितीत जिशान आपल्या विधानामुळे भलताच चर्चेत आला आहे.

मुंबई - अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाचा आनंदोत्सव सध्या मोठ्या प्रमाणावर व्यक्त होताना दिसत आहे. सोशल मीडियावरही त्याविषयावर अनेक पोस्ट व्हायरल होत असून नेटकरी आता नव्या राष्ट्राध्यक्षांना शुभेच्छा देत आहेत. यात अभिनेता जिशान आयुबनेही आपल्या शुभेच्छांविषयीची एक पोस्ट शेयर करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने केलेली अमेरिकन निवडणूकीवर केलेली पोस्ट अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी नुकतीच डेमोक्रेटिक पक्षाच्या जो बायडेन हे निवडून आले आहेत. त्यांच्यावर सोशल मीडियातून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे. यावर जिशानने केलेलं व्टिट व्हायरल होत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भारतात अमेरिकेच्या निवडणूकांविषयी वेगवेगळ्या प्रकारची मतमतांतरे व्यक्त केली जात आहे.

 'मिलिंदचं वय वाढलं,त्याचा बालिशपणा काही गेला नाही'

बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटींनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यासगळया प्रकरणात जिशान आपल्या व्टिटमध्ये असे म्हणतो की, अमेरिका से जलन हो रही है, 4 साल बाद देख लेंगे हम भी...' त्याच्या अशाप्रकारच्या विधानामुळे तो त्याच्यावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

जिशानने याप्रकारचे वक्तव्य़ करुन नेमकं कुणाला लक्ष्य केलं आहे, असा प्रश्न त्याला काही नेटक-यांकडून विचारला जात आहे. बाकी काही का असेना यासगळ्या परिस्थितीत जिशान आपल्या विधानामुळे भलताच चर्चेत आला आहे. बायडेन यांनी ट्रम्प यांचा पराभव केला आहे. ट्रम्प यांना आपला पराभव दिसु लागल्यावर त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यामुळे काही काळ मतमोजणी थांबविण्यात आली होती. अखेर बायडेन यांना विजयी घोषित करण्यात आल्याने अमेरिकन जनतेने त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

'मिलिंद मला तुझा गर्व वाटतो, तु माझा व्हिटॅमिन D'

अमेरिकेच्या उपराष्ट्रध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या निवडून आल्या आहेत. त्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांनाही मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बायडेन आणि हॅरिस हे 20 जानेवारी रोजी शपथ घेणार आहे.
 

 
 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Mohammad Jishan Ayub tweet on america president election