अभिनेता मुरली शर्माला मातृशोक; पद्मा शर्मा यांचे निधन

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 8 June 2020

अभिनेता मुरली शर्मा यांच्या आई पद्मा शर्मा यांचे नवी मुंबईतील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

मुंबई ः गोलमाल, सिंघम, मै हू ना अशा काही हिंदी चित्रपटांबरोबरच मराठी चित्रपटांतही काम करणारा अभिनेता मुरली शर्मा यांच्या आई पद्मा शर्मा यांचे नवी मुंबईतील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

वाचा ः निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मोठा दिलासा; पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याला यश...

पद्मा शर्मा या 76 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर नवी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. मुरली शर्माच्या वडिलांचे-व्रजभूषण शर्मा यांचे गेल्या वर्षी निधन झाले होते.  84 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. 

वाचा ः भीषण ! 'त्या' रुग्णालयात 90 मिनिटांत सात जणांचा मृत्यू, कारण ऐकाल तर धक्का बसेल...

आता त्याच्या आईचे नुकतेच निधन झाले आहे. शर्मा कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुरली शर्मा यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. केवळ हिंदीच नाही तर मराठी आणि दक्षिणेतील सिनेमातही त्यांनी काम केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor murali sharma's mother died today by heart attack