नागेश भोसलेची अनोखी भूमिका 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

अभिनेता नागेश भोसले आता "मेरे साई ः श्रद्धा और सबुरी' या मालिकेत झळकणार आहे. यामध्ये तो ईश्वराचा सच्चा भक्त असलेला आणि सनातनी "सदाशिव' या व्यक्तिरेखेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

"गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा', "गोष्ट छोटी डोंगराएवढी' या मराठी; तर "बिल्लू', "क्‍यूँ की' आणि "शूल' या हिंदी चित्रपटांसह अनेक मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारणारा अभिनेता नागेश भोसले आता "मेरे साई ः श्रद्धा और सबुरी' या मालिकेत झळकणार आहे. यामध्ये तो ईश्वराचा सच्चा भक्त असलेला आणि सनातनी "सदाशिव' या व्यक्तिरेखेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. 

नागेशने धार्मिक, धर्माभिमानी आणि अत्यंत श्रद्धाळू असे त्याच्या व्यक्तिरेखेचे वर्णन केले. तो म्हणाला, ""मेरे साई' या मालिकेतील माझी व्यक्तिरेखा लोकांना काशी आणि इतर धर्मस्थळांना भेट देण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करते आणि हजारो वर्षांपासून धर्माचा एक भाग असलेल्या देवतांच्या पारंपरिक मूर्तीची उपासना करायला सांगते. देव सर्वव्यापी आहे, या संकल्पनेवर विश्‍वास ठेवण्याऐवजी लोकांनी मूर्तिपूजा करावी तसेच धार्मिक स्थळांना भेट द्यावी, असे त्याला वाटते.'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Nagesh Bhosale In Mera Sai Serial