Prakash Raj: ५६ इंचाची छाती असणारे सेल्फी किंग मोदी आता कुठे आहेत? प्रकाश राज यांची पंतप्रधानांवर टीका.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actor prakash raj angry tweet on pm narendra modi after kuno national park female cheetah daksha dies

Prakash Raj: ५६ इंचाची छाती असणारे सेल्फी किंग मोदी आता कुठे आहेत? प्रकाश राज यांची पंतप्रधानांवर टीका..

Prakash Raj on Narendra modi: आपल्या भूमिकेवर ठाम राहून नेहमीच समाजातील वेगवेगळ्या गोष्टींवर तितक्याच आक्रमकपणे भूमिका मांडणाऱ्या प्रकाश राज यांचा चाहतावर्ग मोठा आहे.

ते सोशल मीडियावर सक्रीय असून कायमच त्यांना खटकणाऱ्या गोष्टी पोस्ट करत त्यावर सडेतोड भाष्य करत असतात. गेल्या काही दिवसांपासून ते भलतेच आक्रमक झाले असून मोदी सरकारच्या खटकरणाऱ्या गोष्टींवर ते जोरदार टीका करत असतात.

आज पुन्हा त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

(actor prakash raj angry tweet on pm narendra modi after kuno national park female cheetah daksha dies)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाजावाजा करत दक्षिण आफ्रिकेतून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणलेल्या चित्त्यांपैकी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. चित्त्यांमध्ये झालेल्या झुंजीत 'दक्षा' या मादी चित्त्याचा मृत्यू झाला आहे.

या आधीही दोन चित्त्यांच्या मृत्यू झाला आहे. 'दक्षा'सह आतापर्यंत एकूण तीन चित्त्ये या राष्ट्रीय उद्यानात दगावले आहेत. आता या प्रकरणावरुन अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रकाश राज यांनी 'एएनआय' या वृत्तसंस्थेचे एक ट्वीट रिट्वीट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी कुनो राष्ट्रीय उद्यानातील 'दक्षा' मादी चित्ता दगवल्याची माहिती दिली आहे. यावरून प्रकाश राज यांनी मोदींना थेट सवाल केला आहे.

''५६ इंचाची छाती असणारे सेल्फी किंग आता कुठे आहेत, ज्यांनी या चित्त्यांना इथे आणण्याचे क्रेडीट घेतले होते,'' असे ट्वीट प्रकाश राज यांनी केले आहे. यावर त्यांनी मोदींना टॅग करत 'मी फक्त विचारतोय..' असं लिहिलं आहे.

दरम्यान दक्षिण आफ्रिकेतील नामिबियातून मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात २० चित्ते आणले गेले होते. यातील तीन चित्त्यांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सर्वात पहिल्यांदा ‘साशा’ या मादी चित्त्याचा २७ मार्च रोजी मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर 'उदय' हा चित्ता २३ एप्रिलला निश्चल अवस्थेत मृत आढळून आला आणि त्या पाठोपाठ आता मंगळवारी ९ मे रोजी 'दक्षा' या मादी चित्त्याचा मृत्यू झाला आहे .