बिग बॉसकडून पुष्करला मिळालं अनोखं सरप्राईज

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

पुष्कर मात्र आपल्या सरप्राईची वाट बघत असताना अखेर त्याची पत्नी जास्मिन या घरात शिरली आणि पुष्करचा चेहरा खुलला.

या विकेंडला बिगबॉसच्या घरात रंगलेल्या नाट्यात पुष्करचा गट विजयी ठरल्याने त्याला येत्या आठवड्यात चांगलच सरप्राईज मिळणार असल्याचं या शोचे होस्ट महेश मांजरेकर यांनी म्हटलं होतं. आठवडा सुरु झाला आणि एकापाठोपाठ एक सगळ्याच स्पर्धकांसाठी सरप्राईजेसची रांग लागली. पुष्कर मात्र आपल्या सरप्राईची वाट बघत असताना अखेर त्याची पत्नी जास्मिन या घरात शिरली आणि पुष्करचा चेहरा खुलला. फेलिशा (पुष्करची मुलगी) च्या आयुष्यातले काही महत्त्वाचे क्षण बिग बॉसमध्ये आल्याने पुष्करच्या हातातून निसटले असले तरी याची भरपाई आपण तिघांनीही करण्याचं आश्वासन यावेळी जास्मिनने पुष्करला दिलं. त्याशिवाय आई, ती आणि फेलिशा अशा तिघींनाही पुष्करचा अभिमान असल्याचं तिने म्हटलं आहे. 

घरात पुष्करला भेटल्यानंतर फेलिशा खूप लहान असल्याने तिला बिग बॉसच्या घरात आणण्याची परवानगी नसल्याचं म्हणत जास्मिनने काही वेळासाठी ती गोष्ट टाळली. तर काही क्षणातच फेलिशाच्या बिग बॉसच्या घरातील प्रवेशाने पुष्करचा पहिला फादर्स डे अगदी धमाल साजरा झाला. आपल्या चार महिन्यांच्या चिमुरडीला सोडून बिग बॉसच्या घरात शिरलेला पुष्कर आपल्या छकुलीला दोन महिन्यांनंतर पाहून अतिशय भावूक झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले. तर नावातच आनंद दडलेल्या फेलिशाच्या प्रवेशाने बिग बॉसचं घर खऱ्या अर्थी आनंदून गेलं.

pushkar jog

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Pushkar jog meet his wife and daughter in big boss house