रितेशनं जेनेलियाला कसं प्रपोज केलं पाहिलयं?

actor riteish deshmukh sing tumhein apna banane ki kasam song for genelia dsouza valentines day
actor riteish deshmukh sing tumhein apna banane ki kasam song for genelia dsouza valentines day

मुंबई - व्हँलेटाईनच्या निमित्तानं बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी वेगवेगळ्या प्रकारे आजचा दिवस साजरा केला आहे. मराठमोळ्या रितेशनंही सोशल मीडियावर व्हँलेटाईनच्या औचित्यानं एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यानं जेनेलियाला एक गाणं डेडीकेट केलं आहे. त्या पोस्टला हजारो लाईक्स आणि कमेंट मिळाल्या आहेत. रितेश आणि जेनेलियाचा सोशल मीडियावर असणारा फॉलोअर्स मोठा आहे. ते दोघेही या माध्यमावर नेहमी अॅक्टिव्ह असल्याचे दिसून आले आहे.

रितेशनं 'तुझे अपना बनाने की कसम' हे गाणं जेनेलियासाठी सादर करुन तिला व्हँलेटाईनच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी वेगवेगळ्या प्रकारे आपल्या पार्टनरला शुभेच्छा देऊन आजचा दिवस साजरा केला आहे. त्यांच्या पोस्टला मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. आपल्या प्रिय व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट देण्याचा आजचा दिवस आहे. त्या व्यक्तीप्रती असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठीही व्हँलेटाईनचे निमित्त खास आहे. अशावेळी बॉलीवूडमधल्या सेलिब्रेटींनी आपल्या मनातील भावना सोशल मीडियावर मांडल्या आहेत. तसेच फॅन्सलाही शुभेच्छा दिल्या आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

त्या व्हिडिओमध्ये रितेश आणि जेनेलियाचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे आहेत.  रितेशचा शेवटचा चित्रपट बागी 3 हा होता. त्यात त्यानं टायगर श्रॉफ आणि श्रध्दा कपूर सोबत काम केले होते. येत्या काही दिवसांत तो त्याच्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये सहभागी होणार आहे. जेनेलियाच्या करिअरविषयी सांगायचे झाल्यास तिनं तुझे मेरी कसम मधून चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्यानंतर तेलुगू चित्रपट क्षेत्रातही तिनं नाव कमावले. वेगळी ओळख निर्माण केली. बॉलीवूडमध्ये जेनेलियानं जाने तु या जाने ना, मस्ती, सारखे काही चित्रपट केले. ते चित्रपटही लोकप्रिय झाले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com