'काय रावं, असं असतं का, कुठंही दिसला की काढ फोटो' 

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 24 January 2021

सैफ काही कामानिमित्त बाहेर असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र तो परत आल्यावर त्याच्या घराबाहेर फोटोग्राफरनं गर्दी केली होती.  

मुंबई - कलाकाराची एक छबी टिपण्यासाठी फोटोग्राफर आटापिटा करताना दिसतात. अनेकदा त्यासाठी त्यांच्या घरातही घुसण्यापर्यत त्याची मजल जाते. यासगळ्य़ात त्या कलाकाराला वा त्याच्या परिवाराला मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतं हे त्याच्या गावीही नसतात. अर्थात सगळे सेलिब्रेटी काही सहनशील नसतात. त्यांना त्यांच्या परवानगीशिवाय आपले फोटो काढणे आवडत नाही. अशावेळी त्या फोटोग्राफरची आणि कलाकाराची भांडणे झाल्याची उदाहरणे आहेत.

प्रसिध्द कलाकार सैफ अली खानची तांडवमुळे डोकेदुखी वाढली असताना दुसरीकडे त्याच्या घराच्या बाहेर असलेल्या एका फोटोग्राफरनं काढलेल्या फोटोमुळे तो चांगलाच वैतागलेला दिसला. त्याच्या सुरक्षारक्षकानं संबंधित फोटोग्राफरला समज देऊन बाहेर जाण्यास सांगितले.  फोटोग्राफरच्या आगाऊपणामुळे चिडलेल्या सैफनं फोटोग्राफर्सला  बाहेरचा रस्ता दाखवला. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याची तांडव नावाची वेबसीरीज प्रदर्शित झाली होती. त्यावरुन मोठ्या वादाला सुरुवात झाली. त्या मालिकेवर बंदी घालावी अशी मागणी भाजप सहित अनेक धार्मिक संघटना, पक्ष, यांनी केली होती. तांडवच्या माध्यमातून हिंदूच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न मालिकेतून केला गेला असल्याचा आरोप त्यावर करण्यात आला होता. अशाप्रकारे ती मालिका अनेकांच्या टीकेचा विषय झाली आहे.

सैफ काही कामानिमित्त बाहेर असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र तो परत आल्यावर त्याच्या घराबाहेर फोटोग्राफरनं गर्दी केली होती. त्यातल्या एकानं त्याच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. सैफ आणि त्याचा मुलगा तैमूर हा गाडीतून बाहेर पडतानाचे दृश्य त्या फोटोग्राफरनं ज्यावेळी टिपले तेव्हा सैफ त्याच्यावर रागावला. त्याने हातवारे करत आपली नाराजी याप्रसंगी व्यक्त केली. या प्रसंगाचा व्हिडिओ .  विरल भय्यानी यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वी सैफला तैमूरसोबत त्याच्या इमारतीखाली स्पॉट करण्यात आलं. सैफ तैमूरला घेऊन त्याच्या गाडीतून उतरला आणि इमारतीमध्ये प्रवेश करत होता. याचवेळी सैफला पाहून फोटोग्राफर्सने त्याचे फोटो काढण्यास सुरुवात केली होती. 

मिताली आणि सिद्धार्थचा स्वॅग लुक; हळद आणि मेहंदीला केला जोरदार डान्स

‘तांडव’वरुन सुरु झालेल्या वादामुळे सैफच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  ही मालिका वादामध्ये सापडली आहे. या सीरिजमध्ये भगवान श्रीराम, नारदमुनी आणि शंकर या देवांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor saif ali khan get angry on photographer video viral social media