
कॅटरीनाच्या बहिणीनं यापूर्वी बॉलीवूडमध्ये जम बसविण्याचा प्रयत्न केला होता. तिनं एका पंजाबी गाण्याच्या माध्यमातून डेब्यु केला होता.
मुंबई - बॉलीवूडचा भाईजान असणारा सलमान जसा त्याच्या अभिनयासाठी प्रसिध्द आहे तसा तो त्याच्या रागीट स्वभावासाठीही परिचित आहे. एकदा का कोणी त्याच्याशी पंगा घेतला तर तो त्याला काही सहजासहजी सोडत नाही. अशा एखाद्या कलाकाराला बॉलीवूडमध्ये काम करणे अवघड जाते. आज इंडस्ट्रीमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांना सलमानशी पंगा घेणे महागात पडले आहे. एकेकाळी सलमानचा मेव्हणा असणा-या पुलकित सम्राटला त्याची मोठी किंमत चुकवावी लागली होती. त्याला चित्रपटांमध्ये काम मिळणं अवघड झाले होते. याच्या मागे कोण होतं हे वेगळं काही सांगण्याची गरज नाही. मात्र आता सलमाननं कॅटरिनासाठी त्याच्याशी घेतलेला पंगा बाजूला ठेवला आहे.
सलमान गेल्या काही वर्षांपासून कॅटरिनाच्या बहिणीला बॉलीवूडमध्ये लाँच करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी त्याची तयारीही सुरु आहे. आतापर्यत बॉलीवूडमधल्या अनेक अभिनेत्रींना सलमाननं त्याच्या चित्रपटातून प्रमोट केलं आहे. त्यात उल्लेख करायचा झाल्यास कॅटरीना कैफ (कॅटरीनानं बूम या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं असलं तरी सलमान बरोबर आलेल्या मैंने प्यार क्यु किया चित्रपटातून ती लाईमलाईट मध्ये आली होती. त्यावेळी सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे गेले होते. ) जरीन खान, स्नेहा उलाल, सोनाक्षी सिन्हा, भूमिका चावला, देसी शहा या अभिनेत्रींची नावे सांगता येतील.
आता सलमान कॅटरीनाच्या बहिणीला एका चित्रपटातून प्रमोट करण्याचा विचार करतो आहे. यात आणखी एक विशेष बाब अशी की त्या चित्रपटामध्ये सलमानचा एकेकाळचा मेव्हणा पुलकित सम्राट हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सलमान आणि पुलकितच्या वादाबद्दल सगळ्यांनाच ठाऊक असेल. त्यानं सलमानच्या मानलेल्या श्वेता रोहिरा या मानलेल्या बहिणीबरोबर लग्न केले होते. त्यानंतर त्यांच्यात झालेल्या भांडणामुळे त्याने तिला घटस्फोट दिला. हे प्रकरण त्यावेळी खूप गाजले होते. त्याचा राग सलमानच्या मनात होताच. त्यामुळे त्यानं पुलकितला काम मिळू नये याची काळजी घेतली होती अशी चर्चा ऐकु येत होती. मात्र सलमाननं तो राग बाजूला ठेऊन आपल्या लाडक्या मैत्रीणीच्या बहिणीला बॉलीवूडमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी सलमाननं त्याच्या सोशल मीडियावरुन त्याची माहिती दिली होती. त्यानं इंस्टावर एक पोस्ट शेयर केली होती. त्यात पुलकित आणि कॅटरीनाची बहिण इसाबेल कैफ यांच्या ‘सुस्वागतम खुशामदीद’ या चित्रपटातील एका गाण्याचा फोटो पोस्ट केला आहे. त्यावर कमेंट लिहिली आहे. त्यात त्यानं पुलकितचं कौतूक केलं आहे. आणि त्या दोघांनाही त्यांच्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या चित्रपटात जमशेदपूर येथील प्रशांत सिंग ही दिसणार आहे. धीरज कुमार यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. प्रेम, मैत्री आणि सद्भभावना यांचा संदेश देणारी कथा चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे.
प्रशांत सिंग हा सलमानचा चांगला मित्र असून त्यालाही सलमाननं या चित्रपटाच्या माध्यमातून संधी दिली आहे. त्याविषयी प्रशांतनं सांगितले की, या चित्रपटाची कथा इसाबेलच्या भोवती फिरताना दिसते. त्यात अमन (पुलकित) हा तिचा मित्र आहे. तर सलमान आणि इनाम दुस-या बाजूला. अमन हा इसाबेलवर प्रेम करतो तर सलमानही तिच्या प्रेमात पडला आहे. अशी ही गोष्ट आहे. ही एक रोमाँटिक फिल्म असून त्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
'सीक्रेट्स ऑफ लव्ह' तून होणार ओशोंचे दर्शन; मुख्य भूमिकेत रविकिशन
कॅटरीनाच्या बहिणीनं यापूर्वी बॉलीवूडमध्ये जम बसविण्याचा प्रयत्न केला होता. तिनं एका पंजाबी गाण्याच्या माध्यमातून डेब्यु केला होता. त्या गाण्याचे नाव माशाल्लाह असे होते. तो आता प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. इसाबेल ही कॅटरीनाची कार्बन कॉपी असल्याचे म्हटले जाते.