esakal | ‘मी माझे तोंड उघडले तर…’; मान्यता दत्तची मुलाखत होती चर्चेत
sakal

बोलून बातमी शोधा

maanayata dutt, sanjay dutt

‘मी माझे तोंड उघडले तर…’; मान्यता दत्तची मुलाखत होती चर्चेत

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

अभिनेता संजय दत्तची (sanjay dutt) पत्नी अभिनेत्री मान्यता दत्तचा (maanayata dutt) आज वाढदिवस. मान्यता आणि संजय या दोघांच्या संसाराला 13 वर्षे झाली. संजयचा जवळचा मित्र प्रदीप सिन्हा यांच्या वर्सोवा येथील ब्रदीनाथ टॉवरमधील घरात २००८ साली दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर दोन वर्षांनी २१ ऑक्टोबर २०१० रोजी संजय आणि मान्यताला गोंडस मुलगी इकरा (Iqra Dutt) आणि मुलगा शाहरान (Shahraan Dutt) अशी जुळी मुलं झाली. या दोघांची जोडी नेहमी चर्चेत असते. मान्यता संजयच्या सर्व आर्थिक व्यवहारांकडे लक्ष देत असते. त्याबद्दल एका मुलाखतीमध्ये मान्यताने सांगितले आहे.

मिड डे ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मान्यताने सांगितले होते, 'संजू उगाचंच विनाकारण काही लोकांसाठी खर्च करत होता. मी यामध्ये कोणाचे नाव घेणार नाही. पण संजूने आता लोकांवर पैसे खर्च करणे पूर्णपणे बंद केले आहे. जबाबदारी नसूनही संजय त्या लोकांवर खर्च करत होता. मी त्याला खर्च करायला नकार देत होते. त्यामुळे काही लोकांना मी आवडत नाही. काही चुकीची माणसं त्याचे आर्थिक व्यवहार संभाळत होती. त्याच्या अकाऊंटसमध्ये भरपूर गडबड होती. जर मी माझे तोंड उघडले, तर कोणीही त्यातून सुटणार नाही'

मान्यता ही संजयची तिसरी पत्नी आहे. संजयचे पहिले लग्न दिवंगत अभिनेत्री रिचा शर्मा बरोबर झाले होते. त्यानंतर रिआ पिल्लाईसोबत संजयने पुन्हा लग्न केले. पण त्याचे हे लग्न देखील फार काळ टिकले नाही.

loading image