नर्गिसच्या स्मृतीदिनी संजय दत्तची खास पोस्ट,आईच्या आठवणीत मुलगा भावूक

नर्गिसच्या पुण्यतिथीनिमीत्त संजय दत्तने तिचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Actor Sanjay Dutt Post a photos with hearty massage for nargis on his social media handle on her death anniversary
Actor Sanjay Dutt Post a photos with hearty massage for nargis on his social media handle on her death anniversaryesakal

नर्गिस एके काळी हिंदी चित्रपटातलं नावाजलेलं नाव होतं.तीच्या ब्लॅक अँड व्हाईट स्क्रिनमधील तिच्या चित्रपटाला तीच्या अभिनयाने वजन यायचं.आज या अभिनेत्रीची पुण्यतिथी.अभिनेता संजय दत्तची आई नर्गिस.तीला कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने ग्रासले होते.संजय दत्त त्याच्या आईच्या अतिशय जवळ होता.कॅन्सरशी दिर्घकाळ लढा दिल्यानंतर वयाच्या ५१व्या वर्षी ३ मे १९८१ रोजी नर्गिसचे निधन झाले.(BOLLYWOOD)नर्गिसच्या पुण्यतिथीनिमीत्त संजय दत्तने तिचे काही फोटोज सोशल मिडियावर शेअर केले आहेत.तसेच भाऊक पोस्ट देखिल लिहिली आहे.

संजय दत्तचा पहिला चित्रपट(MOVIE) रॉकी रिलीज होण्याच्या तीन दिवसाआधी नर्गिसचा मृत्यू झाला होता.तरूण वयातच संजयच्या डोक्यावरून आईचे छत्र हरवले होते.त्याने त्याचे हे दु:ख अनेक ठिकाणी बोलताना व्यक्त केले आहे.नर्गिसच्या पुण्यतिथीनिमित्त संजयने त्याच्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करत एक भावपूर्ण कॅप्शनमधील एक पोस्ट इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.नर्गिसच्या आठवणीत संजयने एक भाऊक चिट्ठी देखिल लिहिली आहे.

"असा एकही क्षण जात नाही ज्यावेळी मला तुझी आठवण येत नाही.तु माझ्या जीवनाचा आधार आणि आत्म्याची शक्ती होतीस.तू आज माझ्या मुलांना प्रेम द्यायला त्यांना आशिर्वाद द्यायला हवी होती.अशी माझी मनापासून ईच्छा होती.तुझी रोज आठवण येते आई."असे कॅप्शन संजयने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टला दिले आहे.

संजय कुमारचा भूतकाळ फारसा चांगला नसला तरी वर्तमानात तो त्याच्या चूकांवर उघडपणे बोलतो.आणि अनेक चित्रपट करत आणि कुटुंबाबरोबर वेळ घालवत संजय त्याचं वर्तमान आणि भविष्य दोन्ही चांगले घडवण्याचा पुरेपुर प्रयत्न करतोय.संजय दत्त अक्षय कुमार आणि मानुशी छिल्लरसोबत 'पृथ्वीराज' या चित्रपटात दिसणार आहे.यासंबंधीचे एक पोस्टरही त्याने सोशल मीडियावर शेअर केलेय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com