अभिनेता संतोष जुवेकरच्या फेसबुक पेजवर अश्लील फोटो, चाहत्यांना आवाहन.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actor santosh juvekar facebook account gets hacked hacker share adults picture

अभिनेता संतोष जुवेकरच्या फेसबुक पेजवर अश्लील फोटो, चाहत्यांना आवाहन..

santosh juvekar : झेंडा, मोरया, एक तारा आणि यासारखे कितीतरी चित्रपट गाजवलेला एक उत्तम अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. संतोष बराच काळ चित्रपटातून झळकला नसला तरी त्याचा चाहता वर्ग कमी झालेला नाही. तो सोशल मिडियावरही बराच सक्रिय असतो. पण याच सोशल मीडियाने त्याला अडचणीत आणले आहे. या संदर्भात त्याने एक पोस्ट शेयर करत चाहत्यांना एक विनंती केली आहे. (actor santosh juvekar facebook page gets hacked and hacker share adults picture)

सध्या आपण सगळेच दूर असूनही सोशल मीडिया (Social media) मुळे जवळ आहोत. या आभासी जगाने आपल्याला जोडले आहे. सध्या सोशल मीडिया हा जगण्याचा अविभाज्य घटक बनला आहे. पण या माध्यमाचे जसे फायदे आहेत त्याहून अधिक तोटे ही आहेत. तंत्रज्ञानाचा गैरवापर करून अनेकजन या सोशल मीडियाचा चुकीच्या पद्धतीने वापर करतात. त्यापैकीच एक म्हणजे अकाउंट हॅक करणे. यासंदर्भात अनेकदा भीषण गुन्हे समोर आल्याचे दिसतात. आता असाच अनुभव अभिनेता जुवेकरलाही आला आहे. (santosh juvekar instagram post) (santosh juvekar facebook page hacked )

संतोषनं इन्स्टाग्राम पोस्ट शेयर करत या प्रकाराची माहिती दिली आहे, 'मित्रांनो माझ facebook page (फेसबूक पेज) काही महिन्यांन पूर्वी hack (हॅक) झालं होत. त्यावर फारच अश्लील फोटो पोस्ट केले जात आहेत. मी ह्याची रीतसर तक्रार केली आहे cyber crime (सायबर क्राइम) आणि local police station (स्थानिक पोलिस ठाण्यात) ला पण अजूनही ही व्हायातगीरी सुरूच आहे. कृपया करून त्या page ला report करून block (ब्लॉक) करा. माझ्या त्या page च्या profile चा screenshot (स्क्रीनशॉट) इथे टाकत आहे जेणे करून तुम्हाला ते ओळखण्यास सोप्पे जाईल'. अशी पोस्ट संतोषने शेयर केली आहे.

Web Title: Actor Santosh Juvekar Facebook Page Gets Hacked And Hacker Shares Adults Picture

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top