shilpa shetty and sunanda shetty
shilpa shetty and sunanda shettysakal

फसवणुकी प्रकरणी शिल्पा शेट्टीच्या आईला जामीन

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या आई सुनंदा शेट्टी यांना २१ लाखांचे कर्ज बुडवल्या प्रकरणी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यावेळी...

गेल्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टीच्या (shilpa shetty) आयुष्यातील कायद्याचा ससेमिरा काही कमी झालेला नाही. नाना प्रकरणामुळे त्यांच्या न्यायालयीन वाऱ्या सुरुच आहेत. पती राज कुंद्रा (raj kundra) याच्यावर अश्लील चित्रफीत प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यांनतर त्याला आता कुठे जामीन मिळाला आहे. तोवरच तिच्या आईचे म्हणेज सुनंदा शेट्टीचे (sunanda shetty cheating case) प्रकरण समोर आले आहे.

shilpa shetty and sunanda shetty
काळीज पिळवटून टाकणारी 'माळीण' दुर्घटना मोठ्या पडद्यावर...

शिल्पा शेट्टीची आई, सुनंदा शेट्टी हिच्यावर २०१५ मध्ये फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. सुनंदा शेट्टी यांचे दिवंगत पती सुरेंद्र शेट्टी यांनी २१ लाखांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज शेट्टी यांच्या कॉरगिफ्ट्स कंपनीद्वारे घेण्यात आले होते. सुरेंद्र शेट्टी यांचे २०१६ मध्ये निधन झाले. त्यांनतर शेट्टी परिवाराने या कर्जाजी परतफेड केली नाही. त्यामुळे फसवणुकी प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात शिल्पा शेट्टी आणि तिची बहिण शमिता शेट्टी यांचीही चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सत्र न्यायालयाने शिल्पा आणि शमिता यांच्यावरील कारवाईला स्थगिती दिली. परंतु दंडाधिकाऱ्यांना त्यांच्या आईविरुद्ध कारवाई करण्यास परवानगी दिली.

shilpa shetty and sunanda shetty
धन्यवाद राजसाहेब... शरद पोंक्षे यांनी मानले आभार...

परंतु आता सुनंदा शेट्टी यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. मंगळवारी शहर दिवाणी न्यायालयाने हा जमीन मंजूर केला. कर्ज बुडवणे आणि फसवणूक केल्याप्रकरणी हा खटला पुढे सुरु राहणार आहे. अंधेरी येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने गेल्या महिन्यात सुनंदा शेट्टी यांचा जमीन नाकारला होता. मंगळवारी झालेल्या सुनावणीत सुनंदा कोर्टात हजर होत्या. त्यावेळी त्यांना महानगर दंडाधिकारी आर आर खान यांनी जमीन मंजूर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com