Siddharth Jadhav: 'महाकवी' सिद्धार्थ जाधवची भन्नाट लावणी ऐकून अवधूतला हसू आवरेना.. Video व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actor Siddharth Jadhav wrote funny song of apsara aali sung in khupte tithe gupte show viral video

Siddharth Jadhav: 'महाकवी' सिद्धार्थ जाधवची भन्नाट लावणी ऐकून अवधूतला हसू आवरेना.. Video व्हायरल

siddharth jadhav viral video : मराठी मनोरंजन विश्वातील सदैव आनंदी असणारा, हसणारा - हसवणारा आणि उर्जेने भरलेला असा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव (siddharth jadhav). मराठी मनोरंजन विश्वात त्याची प्रचंड हवा आहे.

आजवर नाटक आणि चित्रपटातून त्याने आपल्या भुरळ घातलीच शिवाय बॉलीवूडलाही वेड लावले. त्यामुळे सिद्धार्थ जाधव हे नाव कायमच लक्ष वेधून घेणारं ठरलं आहे.

आज त्याच्या एका व्हिडिओची प्रचंड चर्चा आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव हा चक्क गाणं लिहू लागला आहे. विशेष म्हणजे त्याचं हे भन्नाट गाणं ऐकून अवधूत गुप्ते हसून लोटपोट झाला आहे. हा भन्नाट व्हिडिओ आणि किस्सा तुम्हीही बघा..

(actor Siddharth Jadhav wrote funny song of apsara aali sung in khupte tithe gupte show viral video)

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर बराच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अवधूत गुप्ते याच्या 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमातील आहे. या मुलाखतीच्या शो मध्ये सिद्धार्थ जाधव आणि संजय नार्वेकर यांना बोलावण्यात आले होते. यावेळी सिद्धार्थ मधील हा टॅलेंट सगळ्यांसामोर आला.

यावेळी सिद्धार्थ म्हणाला, 'एखादं गाणं हिट झालं कि त्याची चाल माझ्या मनात बसते आणि मला शब्द सुचतात. असंच एक गाणं मी अप्सरा आली या लवणीच्या चालीवर लिहिलं आहे.'

त्यावर अवधूत गुप्ते म्हणतो, ',महाकवी ऐकवा की मग..

मग सिद्धार्थ अप्सरा आली च्या चालीवर म्हणतो.. ''कोमल बारमध्ये.. झपकण घुसले.. ऑर्डर दिली वेटरला.. वेटरला आला गालात हसला.. कॉटर दिली त्याने मला.. ही कॉटर नकली.. इंग्लिश असली.. आणायला सांगितली.. मी चार चार बाटल्या झपझप घेतल्या.. चक्कर मला आली.. झपकण खाली..''

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याची ही लावणी ऐकून सगळेच हसू लागतात. आणि अवधूत म्हणतो, अरे तु जितेंद्र जोशीला आव्हान देतोय.. लिखानाच्या बाबतीत.. त्यावर सिद्धार्थ जाधव म्हणतो, ''छे.. तोच माझा पुतळा समोर ठेऊन लिहितो.. तो एकलव्य आहे आणि मी द्रोणाचार्य आहे.' हा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल होत आहे.