याला म्हणतात खरा चाहता; सोनू सूदसाठी चालवली 2000 किमी सायकल

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 22 February 2021

सध्या सोनूनं एक वेगळा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. त्यात त्यानं लॉकडाऊनमध्ये वेगवेगळ्या शहरात अडकेल्या लोकांना त्यांच्या घरी सुखरुप पोहचविण्यासाठी एक मोहिम हाती घेतली आहे.

मुंबई - कलाकार आणि चाहते यांच्यातील नाते काही औरच असते. फॅन्स आपल्या आवडत्या कलाकारासाठी काहीही करायला तयार असतात. अमिताभ आणि त्याच्या चाहत्यांमधल्या हटके गोष्टी आपल्याला माहिती आहेत. बिग बींच्या जन्मदिनाच्या दिवशी त्यांच्या घराच्या बाहेर कित्येक तास बसून राहणा-या फॅन्सची कमी नाही. असाच एक फॅन्स आता चर्चेत आला आहे. तो प्रख्यात अभिनेता सोनू सूदचा चाहता आहे. त्याने त्याच्यासाठी असे काही केले आहे त्याची दखल सोनूला घ्यावी लागली आहे.

नारायण व्यास नावाच्या सोनूच्या एका चाहत्याला आपल्या आवडत्या कलाकाराची भेट घ्यायची होती. सोनू करत असलेल्या सामाजिक कार्याला समर्थन देण्यासाठी त्यानं चक्क महाराष्ट्रातील वाशिम येथून सायकलवर प्रवास सुरु केला तो थेट रामसेतू पर्यंत. हे अंतर 2000 किमी चे असून ते पार करण्यासाठी त्याला 7 दिवस लागले. आता नारायण सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची दखल सोनूनं घेतली आहे. त्याचे कौतूकही केले आहे. रविवारी सोनूनं त्याची भेट घेतली. आणि त्याला पाठींबा दिला.

सध्या सोनूनं एक वेगळा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. त्यात त्यानं लॉकडाऊनमध्ये वेगवेगळ्या शहरात अडकेल्या लोकांना त्यांच्या घरी सुखरुप पोहचविण्यासाठी एक मोहिम हाती घेतली आहे. सोनूचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. त्याला सर्वसामान्य लोकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशाप्रकारच्या सामाजिक कामांमुळे सोनुच्या फॅनफॉलोअर्समध्ये वाढ होत आहे.

अशातच नारायण व्यास नावाच्या फॅन्सनं सोनूचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने वाशिममधून सायकल चालवायला सुरुवात केली ते थेट रामसेतु पर्यतचा 2000 किमीचा प्रवास नारायणनंने सात दिवसांत केला.

सोनूनं रविवारी त्याची भेट घेऊन त्याचा उत्साह वाढविला आहे. त्याचे कौतूकंही केले आहे. बी ए पर्यत शिक्षण घेतलेला नारायण हा वाशिममधील एका कॉलेजात शिपाई म्हणून काम करतो. 7 फेब्रुवारीला नारायण वाशिम येथून निघाला. त्याने आपला सायकल यात्रा 14 फेब्रुवारीला रामसेतू येथे संपवली. त्याचा प्रवास हा 5 राज्यांतून होता. वेगवेगळ्या राज्यात त्याचे जंगी स्वागत झाले होते. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor sonu sood fan dedicates 2000 kilometer cycle ride actor reacts