'देशात गरीबी जास्त नाही, फक्त मदत करणारे श्रीमंत आहेत कमी'

बॉलीवूडमध्ये bollywood गरीबांसाठी नेहमीच अग्रस्थानी असणारा कलावंत म्हणून अभिनेता सोनु सूदकडे sonu sood पाहिले गेले आहे.
actor sonu sood
actor sonu soodTeam esakal

मुंबई - बॉलीवूडमध्ये bollywood गरीबांसाठी नेहमीच अग्रस्थानी असणारा कलावंत म्हणून अभिनेता सोनु सूदकडे sonu sood पाहिले गेले आहे. त्याची लोकप्रियता popularity मोठी आहे. त्याला मानणारा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. त्याची लोकप्रियता एवढी आहे की, त्याला भेटण्यासाठी लोकं शेकडो किलोमीटर पायी प्रवास करत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या काळात लोकांना आर्थिक आधार देण्यात सोनुचा वाटा सर्वाधिक होता. त्यानं व्हॅक्सिन पासून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते. त्याची चर्चाही झाली. त्याच्यावर कौतूकाचा वर्षावही झाला. लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतही त्यानं केली होती. अशा सोनुवर त्याच्या चाहत्यांचा विशेष लळा आहे. ते त्याच्यावर जीवापाड प्रेम करतात. सोनुकडे दररोज येणाऱ्या समस्यांची यादी हजारोंच्या घरात आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यातून सोनुकडे मदतीसाठी निवेदनं येत असतात. सोनु ज्याला शक्य आहे. त्याला मदत करत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यानं त्याविषयी एक पोस्टही शेयर केली होती. आपण मदत करतो. मात्र त्याला मर्यादा असल्याची खंत त्यानं व्यक्त केली. आताही त्याचं एक व्टिट व्हायरल झालं आहे. यात त्यानं आपल्या देशातील गरिबी आणि सद्यस्थिती यांच्या वास्तवाकडे निर्देश केला आहे. सोनु म्हणतो, आपल्या देशात जास्त गरीबी नाही. ती कमी आहे. पण होत काय की, मदत करणाऱ्या श्रीमंत माणसांची आपल्याकडे कमतरता आहे. त्याच्या या पोस्टला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

actor sonu sood
सोनु सुदनं सांगितली झाडु मारण्याची नवी ट्रीक, सफाई कामगार चक्रावले
actor sonu sood
झारखंडमधल्या 50 मुलींना सोनु सुद देणार नोकरी

गेल्या काही दिवसांपूर्वी सोनु हा चर्चेत आला होता. त्याचे कारण म्हणजे त्यानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. सोनु राजकारणात येणार अशा प्रकारच्या अफवा सोशल मीडियावर तोवर व्हायरल झाल्या होत्या. त्यावर सोनुनं एका पत्रकार परिषदेत खुलासा केला होता. आपल्याला काही राजकारणात यायचे नाही. जे काम राजकारणात येऊन करावे लागते तेच काम मी त्या क्षेत्रात न येताही करतो आहे. आपल्याला सध्या लोकांच्या मदतीचा हात हवा आहे. तसे झाल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील. अशी भावनाही सोनुनं यावेळी व्यक्त केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com