'सनीला श्रीदेवीबरोबर का काम करायचं नव्हतं...'

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 20 January 2021

सनीनं त्याच्या अभिनयामुळे एक वेगळी ओळख प्रेक्षकांच्या मनात तयार केली. अदयापही तो बॉलीवूडमध्ये सक्रिय आहे.

मुंबई - अॅक्शन आणि डॅशिंग अभिनेता म्हणून सनी देओलची वेगळी ओळख आहे. संवादफेकीसाठी त्यानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. त्याने आपल्या तीस वर्षांच्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीत अनेक अभिनेत्रीं समवेत काम केले. मात्र त्यातील काही अभिनेत्रींशी त्याचे काही पटले नाही. त्यांच्यात शेवटपर्यत बेबनाव हा कायम राहिला. याचे एक महत्वाचे कारण सनीच्या काम करण्याची पध्दत. त्याचे फार कमी जणांसोबत चांगले ट्युनिंग होते. अपवाद होता तो एका अभिनेत्रीचा.

श्रीदेवीचे निधन होण्याअगोदर सनीनं दिलेल्या एका मुलाखतीत तिच्याविषयक काही गोष्टींचा उल्लेख केला होता. त्यात त्यानं म्हटलं होतं की, श्रीदेवी सोबत काम करायला मी तयार नसायचो. तिच्यासोबत काम करायचे म्हणजे मोठी डोकेदुखी असायची. वास्तविक सनी आणि श्रीदेवी यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यात उल्लेख करायचा झाल्यास निगाहें, चालबाज, राम अवतार, जोशीले आणि सल्तनत या चित्रपटांची नावे सांगता येईल. 80 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय असणारी जोडी म्हणून सनी आणि श्रीदेवीच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. सनीनं 1983 मध्ये बेताब या चित्रपटापासून सुरुवात केली होती. तो चित्रपट त्यावेळी मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला होता. 

Sridevi: Sunny Deol and Sridevi

सनीनं त्याच्या अभिनयामुळे एक वेगळी ओळख प्रेक्षकांच्या मनात तयार केली. अदयापही तो बॉलीवूडमध्ये सक्रिय आहे. सध्या राजकारणात प्रवेश केलेल्या सनीनं वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आपल्या भूमिकांमध्ये केले आहेत. श्रीदेवीबरोबर काम करताना आपल्या मनावर एक प्रकारचा ताण असायचा असे त्यानं म्हटलं आहे. ज्यावेळी एका मुलाखतीच्या दरम्यान त्याला कुठल्या अभिनेत्रीसोबत काम करायला आवडणार नाही असे विचारले त्यावेळी त्यानं श्रीदेवीचे नाव सांगितले होते. त्याविषयी त्यानं सांगितले, श्रीदेवी यांचं सेटवरील वागणं फारसं पसंत नव्हतं. त्याचं असे व्हायचे की. कॅमेराच्या मागे चालणारे गॉसिपिंग सनीला आवडत नसायचे. त्यातून आपल्याविषयी गैरसमज पसरत होते. असे सनीनं सांगितले आहे. अशा कलाकारांना दिग्दर्शक काहीही बोलत नव्हते. मी जेव्हा हे पाहायचो त्यावेळी माझी चिडचिड व्हायची. आपण अॅक्टिंग करायला आलो की भांडणे करायला असा प्रश्न मला त्यावेळी पडायचा. असेही सनीनं सांगितले.

तिचं आणि माझं कधी पटलं नाही , शेवटपर्यत मतभेद राहिले'

1989 मध्ये सनी आणि श्रीदेवी यांचा चालबाज नावाचा चित्रपट आला होता. त्या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या वेळी आपण श्रीदेवीवर नजर ठेवून होतो. ती काय करते, कुणाला काय सांगते, सनीनं असे सांगितले की, आमचे काही सहकलाकार असे होते की, त्यांना आपण थोडं वेगळं केलं तर चित्रपट आणखी चांगला होईल. त्यांना एकमेकांबद्दल कमालीची असुरक्षितता होती. मात्र यासगळ्यात चित्रपटाचे नुकसान व्हायचे हे त्यांच्या लक्षात यायचे नाही. म्हणून आपण काही कलाकारांसोबत काम करायला तयार नव्हतो. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor sunny deol said he not interested to work with sridevi revealed the reason