सूरज के टॅटू चार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

चित्रपटातील लूकसाठी टॅटू आवश्‍यक आहे. तसं तर सूरजला टॅटूची आवड नाही. त्याच्या शरीरावर एक टॅटू आहे; पण या सिनेमासाठी चार टॅटू काढावे लागणारेत.

कलाकारांना एखाद्या भूमिकेसाठी बऱ्याचदा विविध गोष्टींचं प्रशिक्षण घ्यावं लागतं किंवा लूकमध्ये बदल करावा लागतो. अभिनेता सूरज पांचोलीसुद्धा आगामी चित्रपट 'टाइम टू डान्स'साठी खूप मेहनत घेतोय.

Suraj Pancholi

इतकंच नाही; तर तो या चित्रपटासाठी टॅटूदेखील काढणार आहे. यात त्याच्यासोबत इसाबेल कैफ झळकणारेय. या चित्रपटाच्या शूटिंगला या महिन्याच्या अखेरीस लंडनमध्ये सुरुवात होणारेय. सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटातील लूकसाठी टॅटू आवश्‍यक आहे. तसं तर सूरजला टॅटूची आवड नाही. त्याच्या शरीरावर एक टॅटू आहे; पण या सिनेमासाठी चार टॅटू काढावे लागणारेत.

Suraj Pancholi

हे टॅटू काढण्यासाठी दुबईहून टॅटू आर्टिस्ट येणारेय. याबद्दल सूरज सांगतो की, 'या चित्रपटातील भूमिकेला न्याय देण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. चार टॅटू मी काढणार आहे. कारण हा सिनेमा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे.' 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Actor Suraj Pancholi With Tattoos