Shivsena News: "मेहुणे.. मेहुणे...मेहुण्यांचे पाहुणे...." सुशांत शेलारला एकनाथ शिंदेनी दिले मोठे पद ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde, sushant shelar, eknath shinde

Shivsena News: "मेहुणे.. मेहुणे...मेहुण्यांचे पाहुणे...." सुशांत शेलारला एकनाथ शिंदेनी दिले मोठे पद !

adiCM Eknath Shinde News: शिवसेना मुख्य नेते व मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना चित्रपट सेनेची स्थापना करण्यात आली असून निर्माता/लेखन/अभिनय क्षेत्रातील खालील मान्यवरांची कार्यकारिणीत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

यात शिवसेना सचिव आणि अभिनेता सुशांत शेलारची शिवसेना चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नियुक्ती करण्यात आलीय.

(Shiv Sena Secretary Sushant Shelar has been appointed as the President of Shiv Sena Film Sena by cm eknath shinde)

शिवसेना चित्रपट सेनेची कार्यकारणी पुढीप्रमाणे:

अध्यक्ष : सुशांत शेलार

उपाध्यक्ष : अभिनेता राजेश भोसले,शेखर फडके, केतन क्षीरसागर, भरत भानूशाली, शंतनु कुलकर्णी

सरचिटणीस : योगेश शिरसाठ, शर्मिष्ठा राऊत

चिटणीस : कु. अलका परब, अमित कुलकर्णी, विजय सुर्यवंशी, वैभव विरकर

खजिनदार: शरद राणे

अशाप्रकारे एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना चित्रपट सेनेच्या कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली. यात मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकारांचा समावेश आहे.

काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने हिनेही एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता.

शर्मिष्ठाची सुद्धा एकनाथ शिंदेंनी दिलेल्या आदेशानुसार शिवसेना चित्रपट विभागात सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.