सुशांतच्या कुटुंबाने ९ पानी पत्र केलं प्रसिद्ध, म्हणाले 'आम्हाला धमक्या येत आहेत..'

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 12 August 2020

सुशांतच्या कुटुंबाने एक ९ पानी पत्र प्रसिद्ध केलं आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय की सुशांतची हत्या झाली आहे तसंच आमच्या कुटुंबाला आता धमक्या येत आहेत.

मुंबई- सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस किचकट होत चाललं आहे. एकीकडे सुप्रीम कोर्टात या प्रकरणामध्ये मुंबई पोलिस तपास करणार की सीबीआय हे प्रलंबित असताना दुसरीकडे ईडीने मात्र त्यांचा तपास सुरु केला आहे. याच दरम्यान सुशांतच्या कुटुंबाने एक ९ पानी पत्र प्रसिद्ध केलं आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय की सुशांतची हत्या झाली आहे तसंच आमच्या कुटुंबाला आता धमक्या येत आहेत.

हे ही वाचा:  युरोप ट्रीपमध्ये एक पेटिंग पाहिल्यापासून विचित्र वागत होता सुशांत, असं काय होतं त्या पेंटिंगमध्ये ?  

शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुशांतच्या वडिलांवर अनेक आरोप केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाने हे पत्र प्रसिद्ध केलं आहे. हिंदीमध्ये लिहिलेल्या या पत्रात म्हटलं आहे की कशाप्रकारे मुलांची प्रगती होण्यासाठी ते छोट्याशा गावातून मोठ्या शहरात आले. तसंच सुशांतची आई गेल्यानंतर कुटुंबावर कसा दुःखाचा डोंगर कोसळला आणि संपूर्ण कुटुंब एकमेकांच्या जवळ आलं. यामध्ये  त्यांनी आम्हाला न्याय मिळू शकेल की नाही असे प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. 

या पत्राची सुरुवात फिराक जलालपुरी यांच्या शायरीने केली आहे. पत्रात लिहिलंय की, 'प्रसिद्धीसाठी अनेक बनावटी, ढोंगी मित्र, भाऊ मामा मनात येईल ते बोलत आहेत. सुशांतच्या कुटुंबाचा अर्थ काय आहे हे सांगणं आता गरजेचं आहे. सुशांतची आई गेल्यानंतर कोणी असं म्हणायला नको की संपूर्ण कुटुंब उद्धस्त झालं म्हणून आम्ही काहीतरी मोठं करायचं ठरवलं. तेव्हाच सुशांत हिरो बनल्याची बातमी कळाली. त्या पुढच्या आठ-दहा वर्षात ते घडलं ज्याची लोकं स्वप्न पाहतात. सुशांत गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाला दुःख व्यक्त करण्याची देखील संधी मिळाली नाही. आरोपींना शोधायचं सोडून रक्षण करणारे त्याचे फोटो आणि व्हिडिओचं प्रदर्शनामध्ये व्यस्त होते. त्यांच्या निष्काळजीपणामुळे सुशांतला आम्ही गमावलं.'

'एवढ्यानेच त्यांचं मन भरलं नाही तर लगेचच त्याला मानसिक रोगी म्हणून मोकळे झाले. सुशांतचं कुटुंब ज्यामध्ये चार बहिणी आणि एक वृद्ध वडिल आहेत या सगळ्यांना धडा शिकवणार असल्याच्या धमक्या मिळत आहेत. सर्वांच्या चारित्र्यावर चिखलफेक होत आहे. पण या सगळ्यांनी हे विसरता कामा नये की तुम्ही देखील इथेच असणार आहात. उद्या तुमच्यासोबतंही असंच घडू शकतं. सुरक्षेच्या नावावर खुलेआम आरोपींची पाठराखण करतात तेव्हा या दिशेने आपण आपल्या देशाला नेत आहोत का?' असे अनेक  प्रश्न त्यांनी या पत्रात उपस्थित केले आहेत.  

Sushant's family releases 9-page letter, alleges they are getting ...

actor sushant singh rajput family released a 9 page statement  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor sushant singh rajput family released a 9 page statement