
नेपोटिझम, त्यानंतर अंमली पदार्थांचे सेवन यामुळे बॉलीवूडची दिवसेंदिवस प्रतिमा मलिन होत गेल्याचे दिसून आले आहे.
मुंबई - गेल्या वर्षी बॉलीवूडला शरमेनं मान खाली घालावी लागली. त्याचं कारण म्हणजे अभिनेता सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या. त्यानं आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. याप्रकरणाचा तपास सुरु असताना अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. सगळ्यात महत्वाचा म्हणजे नेपोटिझम, त्यानंतर अंमली पदार्थांचे सेवन यामुळे बॉलीवूडची दिवसेंदिवस प्रतिमा मलिन होत गेल्याचे दिसून आले आहे.
* सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाला 7 महिने पूर्ण झाले आहेत. त्याच्या जाण्यामुळे जी मोठी हानी झाली ती कधीही न भरुन येणारी आहे. अद्याप त्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यात संशयित म्हणून अटक केलेल्यांचे खटलेही न्यायालयात सुरु आहेत. मात्र यासगळ्यात सुशांतचे कुटूंब सुशांतच्या फॅन्सला शांततेचे आणि धीर ठेवण्याचे आवाहन करीत आहेत.
* सध्या सोशल मीडियावर सुशांतचे एक जूने पत्र व्हायरल झाले आहे. त्याची बहिण श्वेता सिंग ने ते पत्र पोस्ट केले आहे. त्या पत्रात सुशांतनं आपल्या मनातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
* त्यानं लिहिलं आहे की, मी माझ्या आयुष्यातली 30 वर्षे जगलो आहे. त्यावेळी मला काय व्हायचे आहे याचा विचार करण्यात माझा बराच वेळ गेला. मला जे व्हायचं होतं त्यासाठी संघर्ष करावा लागला. मला चांगल टेनिस खेळायचं होतं. चांगले मार्क पाडायचे होते. हे सगळ एका वेगळ्या नजरेतून मी पाहायला लागलो.
* त्यानं पुढे असे लिहिले आहे की, मी कदाचित तुमच्याशी इतका आनंदी आणि सहमतही नाही. मी नेहमी उत्कृष्ठ होण्याची स्वप्नं पाहत होतो. आता मला कळलं आहे की मी चूकीचा खेळ खेळत होतो. वास्तवात खेळ असा होती की, मुळात मी कोण आहे याचा
* श्वेतानं ज्यावेळी सुशांतची जी नोट व्हायरल केली आहे त्यावेळी ती भावूक झाली आहे. ती म्हणाली सुशांतनं फार गंभीर गोष्ट सांगितली आहे. सुशांतचे फॅन्सदेखील ती पोस्ट वाचून भावनिक झाले आहेत.
* सुशांतच्या परिवाराच्या वतीने सोशल मीडियावर एखादी पोस्ट शेयर केली जाणे ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी सुशांतच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अशाप्रकारच्या पोस्ट शेयर केल्या आहेत. काही वेळा त्याचे गाणे किंवा व्हिडिओही शेयर करण्यात आला आहे.
* मुंबई उच्च न्यायालयानं सुशांतची प्रशंसाही केली होती. कोर्टाने त्याला एक चांगला व्यक्ती असे म्हटले होते. तो निष्पाप आणि साधा मुलगा होता या शब्दांत न्यायालयानं त्याचे कौतूक केले होते.
* सुशांतच्या केस विषयी बोलायचे झाल्यास सीबीआयनं एक तीन पानांचे पत्र प्रसिध्द केले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, सुशांतसिंग प्रकरणात पूर्ण चौकशी झाली असून त्यात वेगवेगळ्या गोष्टींचा बारकाईनं तपास करण्यात आला आहे.