सुशांतच्या आजाराबाबत त्याच्या कुटुंबाला पूर्वीपासूनच माहिती होती ?

सुस्मिता वडतिले 
Wednesday, 2 September 2020

सुशांतला २०१३ पासूनच एका मानसिक आजार होता आणि त्याच्या या मानसिक आजाराबाबत त्याच्या कुटुंबानांदेखील अगोदरच सर्व माहिती होते. 

मुंबई : अनेक दिवसांपासून अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसंबंधित चर्चा सुरु आहे. त्यातीलच आणखीन एक अशी माहिती समोर आली आहे की, सुशांतला २०१३ पासूनच एका मानसिक आजार होता आणि त्याच्या या मानसिक आजाराबाबत त्याच्या कुटुंबानांदेखील अगोदरच सर्व माहिती होते. 

सुशांतच्या कुटूंबियांनी मुंबई पोलिस आणि सर्वोच्च न्यायालय येथे ही सर्व माहिती दिली होती. यावेळी सुशांतची मोठी बहीण म्हणजेच मितू सिंह म्हणाली, सुशांतने आमच्या कुटुंबातील सर्वांना ऑक्टोबर 2019 मध्ये मला (सुशांत) नैराश्य वाटत असल्याचे सांगितले होते. त्यावेळी नीतू आणि प्रियांका मुंबईकडे विमानाने गेल्या. त्यावेळी त्या काही दिवस सुशांतसोबत एकत्र होत्या. सुशांतला 2019 मध्ये आपण नैराश्यात आहोत असे समजल्याने त्यावेळी त्याने डॉ. के चावला यांच्याकडून औषध घेण्यास सुरुवात केली.

मुंबई पोलिसांसमोर सुशांतच्या बहिणींचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे. या जबावाची एक कॉपी सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील देण्यात आलेली आहे. त्यांनी दिलेल्या जबाबातून असे स्पष्ट होत आहे की, 2013 पासून सुशांतच्या कुटुंबीयांना त्यांच्या मानसिक आजाराबाबत माहित होते.

सुशांतची बहिण मितू सिंह यांच्या स्टेटमेंटनुसार लॉकडाउनमध्ये सुशांत घरामध्येच होता. त्या दिवसात तो व्यायाम आणि पुस्तके वाचत होता. (08 जून) ला सुशांतने मितूला भेटण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी मितूने सायंकाळी सुशांतला ठिक वाटत नसल्याचे सांगितले. त्यामुळे सुशांत लॉकडाऊनमध्ये बाहेर कुठेही जाऊ शकला नव्हता. त्यावेळी सुशांतची बहिण मितू त्याच्याबरोबरच राहिली होती.

त्यावेळी त्यांनी सुशांतचा दक्षिण भारतात जाण्यासाठीचा नियोजनाची चर्चा केली होती. मितू सुशांतला पदार्थ आणि वस्तू बनवत देत होती. त्यांनतर 12 जूनला मितूची मुलगी घरी एकटीच असल्यामुळे ती तिच्या गोरेगावच्या घरी गेली. त्यानंतर मितूने सुशांतला सांगितले होते, परंतु त्याने काहीच उत्तर दिले नाही.

मितूने 'त्या'दिवशी सुशांतला फोन केला होता परंतु... 

मितूने दिलेल्या माहितीनुसार, मी 14 जूनला 10.30 वाजता सुशांतला फोन केला, परंतु त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे सिद्धार्थ पिठानीला फोन केल्याची माहिती सांगितली आहे. यावेळी पिठानीने मितूला सांगितले की, सुशांतला नारळाचे पाणी आणि डाळिंबाचा रस दिला आहे, तो झोपला असेल. मितूने सिद्धार्थला सुशांतला पाहण्यास सांगितले, तेव्हा त्याचा दरवाजा आतून बंद होता. तेव्हा मितू म्हणाली की, तो कधीच दार बंद करत नाही, त्यामुळे तिने दार उघडण्यास सांगितले.

थोड्यावेळात मितूला पुन्हा एकदा पिठानीचा फोन आला. त्यावेळी त्यांनी सांगितल की, सुशांतने दरवाजा उघडला आहे आणि तो हिरव्या कुर्त्यामध्ये पंख्यावर लटकलेल्या अवस्थेत सापडला आणि त्यावेळी त्यांनी त्याला पलंगावर खाली उतरवले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Sushant Singh Rajput's family already knew about his depression