अक्षयाला ''सुयश''  लाभले नाही, खरे की खोटे ? : सुयश टिळक आणि अक्षया यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्याची चर्चा

 actor suyash tilak actres akshaya devdhar allegedly broke up
actor suyash tilak actres akshaya devdhar allegedly broke up

मुंबई -चित्रपटात अथवा मालिकेत आपल्या आवडत्या कलाकाराचा झालेला ब्रेक अप त्याचे त्या चाहत्याला फारसे नवल वाटत नाही.  केवळ एक प्रकारचे गॉसिप म्हणुन त्याकडे पाहिले जाते. मात्र त्या कलाकाराच्या '' रियल लाईफ '' मध्ये झालेल्या काही गोष्टीबद्दल त्याला कमालीचे कुतूहल असते. तुझ्यात जीव रंगला' मधुन घरोघरी पोचलेल्या अंजली पाठकबाई अर्थात अक्षया देवधर यांचा ख-या आयुष्यात सुयश टिळक याच्या बरोबर झाल्याची चर्चा आहे. या दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचे बोलले जात आहे.

'तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील अंजलीच्या भूमिकेमुळे अभिनेत्री अक्षया देवधरला वेगळी ओळख मिळाली. अंजलीपेक्षा ‘पाठकबाई’ या पात्राच्या माध्यमातुन आणखी नावाजली गेली. अंजलीबाईंचा जीव जडला तो ‘का रे दुरावा’ फेम जयवर. त्याचे खरे नाव सुयश टिळक. इन्स्टाग्राममुळे ज्यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे मराठी मालिकाक्षेत्रातील प्रसिध्द जोडपं. दोघांनीही आपल्या नात्याची जाहीर कबुली कधीच दिली नसली, तरी सोशल मीडियावरुन त्यांच्या रिलेशनशीपच्या चर्चा चाहत्यांमध्ये नेहमी होत असे.

मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या नात्यात सारे काही आलबेल नसल्याचे बोलले जाते. त्या सुयश-अक्षयाचे ब्रेकअप झाल्याचे आराखडेही इन्स्टाग्राममुळेच बांधले जात आहेत. अक्षया आणि सुयश एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर झळकू लागल्यावर. कधी त्या फोटोंना ‘मिस यू’ कॅप्शन असायचं, तर कधी हार्ट शेप इमोजी, कधी अक्षयाच्या बोटातील अंगठी चाहत्यांचं लक्ष वेधून घेऊ लागली. दोघांचा साखरपुडा झाल्यावर चाहत्यांनीच शिक्कामोर्तब केलं. मात्र याला अक्षया किंवा सुयशपैकी कोणीही कधीच दुजोरा दिला नव्हता.

सुयश आता ‘खाली पिली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अभिनेता इशान खट्टर, अभिनेत्री अनन्या पांडे यामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. तर ‘मंग्या’ नावाचे पात्र सुयश साकारणार आहे. ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेतून सुयश प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com