
प्रसिध्द अभिनेता जॅकी श्रॉफ आणि त्याची दोन्ही मुले टायगर आणि मुलगी कृष्णा श्रॉफ हे त्यांच्या फिटनेससाठी प्रसिध्द आहेत.
मुंबई - बाप तसा बेटा असे आपण अनेकदा म्हणतो, त्याचा प्रत्ययही आपल्याला भेटतो. मात्र जशी आई तसा मुलगा असे म्हटले तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. याचे कारण म्हणजे बॉलीवूडमधला प्रसिध्द अॅक्शन हिरो असणा-या टायगरच्या आईचं वर्कआऊट पाहुन तुम्ही थक्क होऊन जाल. आपल्या डान्स आणि अॅक्शनमुळे प्रसिध्द असणा-या टायगरचा फॅन फॉलोअर्स मोठा आहे. हॉलीवूडच्या प्रसिध्द अॅक्शन हिरोंना आव्हान देण्याची क्षमता असणा-या टायगरनं अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे.
प्रसिध्द अभिनेता जॅकी श्रॉफ आणि त्याची दोन्ही मुले टायगर आणि मुलगी कृष्णा श्रॉफ हे त्यांच्या फिटनेससाठी प्रसिध्द आहेत. त्यांच्या वर्कआऊटला फॉलो करणा-यांची संख्याही मोठी आहे. या दोघांच्या वर्कआऊटचे व्हिडिओ इंस्टावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. मात्र हे फार कमी जणांना माहिती असेल की त्यांची आई आयशा श्रॉफ या देखील फिटनेसच्या बाबत कमालीच्या दक्ष आहेत. आपल्या दोन्ही मुलांच्या बरोबरीनं त्या व्यायाम करतात. आपणही काही कमी नाही हे त्यांनी त्यांच्या वर्कआऊटमधून दाखवून दिलं आहे.
आयशा यांचा फोटो पाहिल्यानंतर कळते की, त्यांनी आपल्या फिटनेसवर किती बारकाईनं लक्ष दिले आहे ते. सोशल मीडियावर आयशा यांनी काही व्हिडिओज शेयर केले आहेत. त्यात टायगरच्या आईनं अशी कमाल केली आहे की बघताना थक्क व्हायला होते. आयशा यांनी शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी चक्क 95 किलो वजन उचलेले आहे. वय वर्षे 60 असणा-या आयशा यांच्या त्या व्हिडिओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. त्या व्हिडिओमध्ये आयशा यांच्या जवळ टायगर उभा आहे. व्हिडिओला कॅप्शन देताना आयशा यांनी लिहिले आहे की, शेवटी करुन दाखवले 95 किलो वजन.
'आमचं झालं, वरुण - नताशानं घेतले सात फेरे'
आईचा एवढा जबरदस्त व्हिडिओ पाहिल्यानंतर मुलगी कृष्णा आणि अभिनेत्री दिशा पटानीने आश्चर्य व्यक्त केले आहे. कृष्णानं गंमतीत लिहिले आहे की, शाब्बास मुली, आता मला तुझ्यापर्यत पोहोचण्यासाठी आणखी काही वेगळे करण्याची गरज आहे. दिशानं लिहिलं आहे की, ‘गज़ब की ताक़त’