'नवरदेव लग्नाला निघाला, गाडीला झाला अपघात'  

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 24 January 2021

अलिबाग येथील ‘द मॅन्शन हाऊस’ येथे वरुण आणि नताशा यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. यावेळी त्यानं काही खास पाहुण्यांनाच निमंत्रण दिलं आहे.

मुंबई - बॉलीवूड जगताचं लक्ष लागलेल्या अभिनेता वरुण धवन आणि नताशा यांच्या लग्नाचा दिवस समीप आला असताना त्याला मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागल्याचे दिसून आले आहे. तो लग्नासाठी अलिबागकडे निघाला होता. त्यावेळी त्याच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे त्याला कुठलीही इजा झालेली नाही.

ऐन लग्नाच्या एक दिवस अगोदरच अशाप्रकारच्या प्रसंगाला सामोरं जावे लागल्याने त्याच्या परिवारातील सदस्यांनी चिंता व्यक्त केली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की शनिवारी वरुण हा त्याच्या जुहू येथील घरापासून अलिबागकडे जाण्यास निघाला. त्या प्रवासा दरम्यान त्याचा अपघात झाला. या अपघातात त्याला कुठलेही दुखापत झालेली नाही. वरुण धवन आज (24 जानेवारी) नताशा दलालसोबत विवाहबध्द होणार आहे. लग्नाच्या तयारीसाठी वरुण आणि नताशाच्या घरातली मंडळी शुक्रवारीच अलिबागला पोहोचले होते. मात्र, काही कारणास्तव वरुणला जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे तो 23 तारखेला त्याच्या कारने अलिबागच्या दिशेने रवाना झाला होता. याचवेळी वाहतूक कोंडीत सापडलेल्या वरुणच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्याच्या गाडीचं किरकोळ नुकसान झालं आहे. परंतु वरुणला कोणतीही दुखापत झालेली नाही.

 नताशा होणार वरुण की दुल्हनिया; 24 जानेवारीला अडकरणार लग्नाच्या बेडीत

अलिबाग येथील ‘द मॅन्शन हाऊस’ येथे वरुण आणि नताशा यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. यावेळी त्यानं काही खास पाहुण्यांनाच निमंत्रण दिलं आहे. लग्नसोहळ्यात केवळ 50 जणांनाच बोलविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसंच सुरक्षेची अत्यंत कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यात मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. या लग्नसोहळ्यात कलाविश्वातील काही सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. यात करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, कतरिना कैफ, कियारा आडवाणी, अनिल कपूर, जान्हवी कपूर हे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Varun Dhawan Wallpapers | varun-dhawan-31 - Bollywood Hungama

वरुण धवन आणि नताशा दोघेही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या तारखेवरून गप्पा रंगण्यास सुरुवात झाली होती. त्याचे काका अनिल धवन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, माझ्या पुतण्याचे लग्न येत्या 24 जानेवारीला होणार आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. आता त्याच्या लग्नाची तयारी सुरु केली होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Varun Dhawan Car Accident in Alibaug Ahead of Wedding With Natasha Dalal