'आमचं झालं, वरुण - नताशानं घेतले सात फेरे'

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 25 January 2021

वरुण धवनचे काका अनिल धवन यांनी एका मुलाखतीच्या माध्यमातून वरुणच्या लग्नाची तारीख जाहीर केली होती. त्यानंतर लग्नाच्या तयारीची गडबड सुरु झाली.

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांचा विवाह सोहळा अनेक कारणांसाठी चर्चेत राहिला होता. लग्नाला जाताना वरुणच्या गाडीला झालेला अपघात, बॉलीवू़मधील निवडकच सेलिब्रेटींना दिलेलं निमंत्रण, लग्नाच्या ठिकाणी असलेला कडेकोट बंदोबस्त यामुळे वरुणचं लग्न सोशल मीडियावर चर्चेचा विषय होता. अखेर त्याचं लग्न मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडले आहे. अलिबाग मधील एका पंचतारांकित मोजक्याच व्यक्तींच उपस्थित होत्या.

वरुण धवनचे काका अनिल धवन यांनी एका मुलाखतीच्या माध्यमातून वरुणच्या लग्नाची तारीख जाहीर केली होती. त्यानंतर लग्नाच्या तयारीची गडबड सुरु झाली. अलिबाग मधील मॅन्शन हाऊस मध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडला. त्यात वरुण आणि नताशाचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक उपस्थित होते. तसेच निवडक बॉलीवूडमधील कलाकार हजर राहिले होते. आरोग्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव लग्नाला उपस्थित राहणा-यांची संख्याही मर्यादित ठेवण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली होती. वरुणच्या लग्नाला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लग्नाला येणा-यांना मोबाईल बाळगण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यांच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

रविवारी 24 जानेवारीला त्यांचा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर वरुण-नताशाच्या संगीत सोहळ्याचे फोटो समोर आले होते. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. त्यांना लग्नाचे फोटो पाहण्याची उत्सुकता लागली होती. आता या दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. निवडक लोकांनाच या सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं.

 'कपिल शर्मा शो’ बंद होणार कारण ...

या लग्नसोहळ्यात केवळ 50 जणांनाच आमंत्रण देण्यात आल्याचं सांगितले होते. सध्या सोशल मीडियावर या सोहळ्यातील काही फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या लग्नसोहळ्यात  सेलिब्रिटी हजेरी लावली होती. यात करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, कतरिना कैफ, कियारा आडवाणी, अनिल कपूर, जान्हवी कपूर यांचा समावेश होता. 

 
 
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor varun Dhawan married with Natasha dalal photo viral on social media