Happy BirthDay Vicky Kaushal : तरूणींच्या 'दिल की धडकन' विकीचा बर्थडे!

गुरुवार, 16 मे 2019

'मसान'पासून ते 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक'पर्यंत यशस्वी प्रवास केलेल्या आणि कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता विकी कौशल याचा आज वाढदिवस!

'मसान'पासून ते 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक'पर्यंत यशस्वी प्रवास केलेल्या आणि कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता विकी कौशल याचा आज वाढदिवस! आज विकीचा 30वा वाढदिवस असून सोशल मीडियामध्ये विकीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

vicky

'मसान'मधील दिपक चौधरी, 'राझी'मध्ये इक्बाल, 'संजू'मध्ये कमली, 'मनमर्झिया'मधली विकी, 'लस्ट स्टोरीज' या वेबसिरीजमध्ये पारस, तर, 'लव्ह पर स्क्वेअर फूट'मधील संजय चतुर्वेदी आणि उरीमधल्या मेजर विहान शेरगिल या भूमिकांमुळे प्रेक्षकांनी विकीला डोक्यावर घेतले. उरीमध्ये त्याने साकारलेल्या आर्मीमॅनमुळे त्याच्या करिअर टर्निंग पॉईंट मिळाला.

vicky

मुंबईमध्ये पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या विकीचे वडील शाम कौशल हे साहसी दृश्य दिग्दर्शक, तर आई गृहिणी आहे. त्याचा लहान भाऊ सनी कौशल हा ही अभिनेता आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात पदवीधर असलेल्या विकीचे नोकरीत मन रमले नाही, त्यामुळे तो अभिनय क्षेत्राकडे वळला. त्याने काही चित्रपटाचे सहदिग्दर्शनही केले आहे. आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती, त्याच्या आगामी उधम सिंह यांच्यावर आधारित चित्रपटाची!

 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Vicky Kaushal turns 30