esakal | ग्रेट! कलाकार आणि खेळाडूंनी एकत्र येत कोरोनायोद्ध्यांसाठी पाठवले 'एवढे' पीपीई किट...
sakal

बोलून बातमी शोधा

celebrity

डॉक्टर्स, नर्सेस तसेच अन्य आरोग्य कर्मचारी आणि कामगारांना कोरोनाशी लढण्यासाठी हातभार लावला आहे.   याबाबत या कलाकारांनी एक व्हिडीओदेखील बनविला आहे आणि त्यामधून डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

ग्रेट! कलाकार आणि खेळाडूंनी एकत्र येत कोरोनायोद्ध्यांसाठी पाठवले 'एवढे' पीपीई किट...

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : कोरोना महामारीमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मदतीसाठी पुढे आले आहेत. कुणी मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी मदत करीत आहे तर कुणी पडद्यामागच्या कामगार तसेच तंत्रज्ञांना मदतीचा हात देत आहे. काही ना काही मदत बॉलीवूडकडून होत आहे. आता आघाडीची अभिनेत्री विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, दिया मिर्झा, रिचा चढ्ढा, पूजा हेगडे, अली फजल आणि वीर दास ही मंडळी एकत्र आली आणि त्यांनी देशभरातील जवळजवळ पन्नासहून अधिक रुग्णालयांमध्ये वीस हजारांपेक्षा अधिक पीपीई किटस पाठविले आहेत. 

आता सुट्या पैशांची कटकट मिटली! बसमध्ये टिकीट घेतांना वापरा 'ही' पेमेंट पद्धत

डॉक्टर्स, नर्सेस तसेच अन्य आरोग्य कर्मचारी आणि कामगारांना कोरोनाशी लढण्यासाठी हातभार लावला आहे.   याबाबत या कलाकारांनी एक व्हिडीओदेखील बनविला आहे आणि त्यामधून डॉक्टरांचे आभार मानले आहेत. या व्हिडीओमध्ये विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, अली फजल, दिया मिर्झा, क्रिकेटर हरभजन सिंग, कॉमेंटेटर हर्षा भोगले हे सहभागी झाले आहेत. मुंबईतील केईएम हॉस्पिटल आणि कामा हॉस्पिटलपासून ते हैदराबाद, रत्नागिरी, लखनऊ, पुणे, इंदूर, पंजाब आणि दिल्ली अशा शहरांमध्ये ही मदत पोहोचली आहे. 

नियतीची अशीही परीक्षा; आई कस्तुरबा रुग्णालयात तर बाळ ऑपरेशन थिएटरमध्ये...

याकरिता मनीष मुंद्रा यांच्याकडून प्रेरणा घेण्यात आली आणि सेलिब्रेटी फोटोग्राफर आणि निर्माता अतुल कसबेकर यांनी या कामासाठी पुढाकार घेतला आणि या सेलिब्रेटी मदतीसाठी पुढे आले व मदत देण्यात आली. याबाबत अतुल कसबेकर म्हणाले, की लॉकडाऊनमुळे आपण सुरक्षित घरी असताना डॉक्टर्स, नर्सेस तसेच अन्य मंडळी सतत झटत होती. सरकारी अधिकारी अधिकाधिक प्रयत्न करीत असताना नागरिकांनी शक्य होईल त्या मार्गाने पाऊल उचलणे हे देखील त्यांचे कर्तव्य आहे. याचसाठी आम्ही एकत्र आलो आणि आवश्यक सेवेत असलेल्यांना मदत केली. 

loading image
go to top