esakal | 'एक दिवस तुमच्यासोबत काम करेल बच्चन सर' बाबिलची पोस्ट

बोलून बातमी शोधा

actors babil khan shares photo
'एक दिवस तुमच्यासोबत काम करेल बच्चन सर' बाबिलची पोस्ट
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता इरफान खान याचे गेल्या वर्षी एका आजारानं निधन झालं. त्याचे जाणं हे सर्व बॉलीवूडसाठी वेदनादायी होते. त्यानंतर त्याचा मुलगा बाबील यानं सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. यापूर्वीही त्याच्या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे, बाबीलनं आता जी एक पोस्ट शेअर केली आहे त्यात त्यानं ब़ॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याच्या त्या पोस्टला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

बाबिल खाननं काला या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या चित्रपट प्रवासाला सुरुवात केली आहे. यावेळी बाबिलनं आपले वडिल इरफान खान आणि अमिताभ बच्चन यांचा एक फोटो शेअर केला आहे. तो फोटो 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या पीकु या चित्रपटातील आहे. त्याचं काय आहे की, बाबिलनं अमिताभ बच्चन यांच्याबरोबरील काला चित्रपटातील एक पोस्ट शेअर केली आहे. तो अमिताभ यांच्याबरोबर बाबिलचा पहिलाच चित्रपट आहे. यावेळी त्यानं चित्रपटाच्या सर्व टीमला शुभेच्छाही दिल्या आहेत. बाबिलनं आपल्या पोस्टबाबत आनंद व्यक्त केला आहे. काला च्या प्रवासाविषयीच्या आठवणींना बाबिलनं उजाळा दिला आहे.

बाबिलनं यावेळी सोशल मीडियावर जो फोटो शेअर केला आहे त्यात इरफान खाननं अमिताभ बच्चन यांची गळाभेट घेतली आहे. या फोटोमध्ये अमिताभ हे भलतेच खुश दिसत आहे. हा फोटो शेअर करताना बाबिलनं अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. आणि एक पोस्ट लिहिली आहे.

बाबीलनं लिहिलं आहे की, मी फार लवकर पॅनिक होऊन जातो. आणि चिंता करायला लागतो. मात्र त्यानंतर मला असे दिसून येते की, बाबांचे फॅन्स हे फार दयाळु आहेत. त्यामुळे व्देषाला सामोरं जायला शिकणं जास्त गरजेचं आहे असे मला आता कळले आहे. काही गोष्टी टाळणं जास्त गरजेचं असतं. मी एक दिवस मोठा हिंमतवान होईल. त्यावेळी बाबाचे जे फॅन्स आहेत त्यांना माझ्यावर गर्व असेल आणि एक दिवस मी तुमच्या सोबत नक्की काम करेल अमिताभ बच्चन सर...