''माझा साखरकारखाना'' : अभिज्ञा भावेचा झाला साखरपुडा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

अभिज्ञा आणि मेहुलचा साखरपुडा अगदी साध्या पध्दतीने पार पडला असून, कोरोनामुळे लग्नाची तारीख पुढच्यावर्षीपर्यंत ढकलण्यात आली आहे. 

पुणे : खुलता कळी खुलेना, तुला पाहते रे, या मालिकांमध्ये तर Moving Out या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या मनात स्वत:चे स्थान निर्माण करणारी अभिज्ञा भावे हिचा साखरपुडा झाला आहे. 'माझा साखरकारखाना' अशी मजेशीप कॅपशन देत अभिज्ञाने इन्स्टांग्रामवर साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले. मेहूल पै या उद्योजकासोबत ती लग्न बंधनात अडकणार आहे. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Abhidnya bhave (@abhidnya.u.b) on

 

अभिज्ञा आणि मेहुलचा साखरपुडा अगदी साध्या पध्दतीने पार पडला असून, कोरोनामुळे लग्नाची तारीख पुढच्यावर्षीपर्यंत ढकलण्यात आली आहे.


याबाबत टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, ''आम्हाला दोघांनाही भूतकाळातील नात्यांमध्ये जो काही अनुभव आला त्या नंतर मोठा समारंभ किंवा कार्यक्रम करायचा नव्हता. लग्नाची तारीख अद्याप ठरवलेली नसून 2021 मध्ये आम्ही लग्नगाठ बांधू.''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Abhidnya bhave (@abhidnya.u.b) on

मेहूल आणि अभिज्ञा एकाच कॉलेजमध्ये होते. गेल्या 15 वर्षांपासून दोघेही ऐकमेकांना ओळखत आहे. काही काळ त्यांचा संपर्क नव्हता पण पुन्हा ते ऐकमेकांच्या संपर्कात आले. दोघांचाही घटस्फोट झाल्याने जवळच्या लोकांनी त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला होता पण दोघांच्याही मनात पुन्हा लग्नाबाबत काही प्रश्न होते. नंतर दोघांनी मिळून लग्न करण्याचा निर्णय घेतला.
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Abhidnya bhave (@abhidnya.u.b) on

2014 साली अभिज्ञाचे वरुन वैटीकरसोबत लग्न झालं होतं मात्र, या दोघांचे नाते फार काळ टिकले नाही. त्यामुळे दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

अभिज्ञाला खुलत कळी खूलेना मालिकेतील नकारात्मक भूमिकेमुळे ओळख मिळाली. त्यानंतर सुबोध भावे व गायत्री दातर यांच्यासोबत तुला पाहते रे मालिकेतही तिने महत्वपुर्ण भुमिका साकारली. तसेच Moving Out या मराठी वेबसिरिजमधील  भूमिकेमुळे देखील ती चर्चेत होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Always grateful #myforever

A post shared by Abhidnya bhave (@abhidnya.u.b) on

अभिनयाकडे वळण्याआधी ती एअर होस्टेस म्हणून काम करत होती. अभिज्ञा आणि तेजस्विनि पंडित यांचा तेजाज्ञा हा फॅशन ब्रँन्डही फार फेमेस आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress Abhidnya Bhave is engaged