लॉकडाऊनमध्ये घरात काय करायचं? याचं उत्तर देतेय जिजाऊंची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता पवार

दिपाली राणे-म्हात्रे, प्रतिनिधी
Tuesday, 14 April 2020

लॉकडाऊनच्या काळात घरी बसून आपण काय करावं हा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनात उद्भवला आहे. याचं उत्तर दिलं आहे सोनी मराठीवरील 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत जिजाऊंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अमृता पवार हिने.

मुंबई- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. याच धर्तीवर सध्या देशभरात लॉकडाऊनही वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. लॉकडाऊन, म्हणजे घराबाहेर पडायचं नाही.. आता या लॉकडाऊनच्या काळात घरी बसून आपण काय करावं हा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनात उद्भवला आहे. याचं उत्तर दिलं आहे सोनी मराठीवरील 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत जिजाऊंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अमृता पवार हिने.

हे ही वाचा: मराठीतील प्रसिद्ध मालिका 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर-महामानवाची गौरवगाथा' आजपासून हिंदीमध्ये प्रदर्शित

आपण आपल्या आयुष्यात एवढे व्यस्त आहोत की आपल्या जवळच्या व्यक्तींना देण्यासाठीही आपल्याकडे वेळ नाही. ही वेळ कोरोनाने आपल्याला देऊ केली आहे. ज्याने संपूर्ण घर एकत्र आलं आहे. यावेळी सरकारला साथ देऊन आपण घरीच बसावं आणि घरच्यांबरोबर हा वेळ सत्कारणा लावावा, असं अमृता सांगते..

Amruta Pawar Biography, Wikipedia, Birthday, Age, Jijamata ...

मनोरंजनाचे बरेच पर्याय घरबसल्या उपलब्ध आहेत. सोनी मराठी ही वाहिनी आपल्या वेगवेगळ्या मालिकांमधून बऱ्याच चांगल्या गोष्टी प्रेक्षकांसमोर मांडत असते. तसेच आई आणि मुलाचं नातं कसं असावं? याचं उत्तम उदाहरण 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. या मालिकेच्या शूटींगदरम्यान बऱ्याच चांगल्या गोष्टी मलाही शिकता येतात. यामुळे नकळत माझ्यावर ही संस्कार होत आहेत. असंच काहीतरी वेगळं आत्मसात करण्याची दृष्टी तुम्ही ही बाळगा असं अमृताने म्हटलंय..

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Hold onto what makes you happy... #LoveForHorses

A post shared by Amruta Pawar (@pawaramruta) on

सोनी मराठीवरील 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेतून होणारे संस्कार असतील किंवा 'ह.म.बने तु.म.बने' या मालिकेत हाताळले जाणारे विषय किंवा 'आनंदी हे जग सारे' आणि 'नवरी मिळे नवऱ्याला' यासारखे एकूणच वेगळे विषय. सोनी मराठी आपल्यापरीने मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधनात आपला खारीचा वाटा नेहमीच उचलते. सध्या सगळंच थांबल्यामुळे पुन:प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या मालिकांकडे एका वेगळ्या दृष्टीने पहा. सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेतून शिवबा-जिजाऊंच्या नात्याची गोष्ट अनुभवायची ही संधी आहे..

actress amruta pawar said experience the mother son relation in lockdown again with swarajyajanani jijamata serial


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress amruta pawar said experience the mother son relation in lockdown again with swarajyajanani jijamata serial