
‘पुनःश्च हनिमून’, चाहत्यांसाठी अमृता सुभाषची खास पोस्ट
मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमठवणारी अमृता सुभाष सध्या चर्चेत आली आहे. अमृता नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारात चाहत्यांच्या मनावर हक्क गाजवताना दिसते. दरम्यान तिनं आपल्या चाहत्यांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिनं ‘पुनःश्च हनिमून’ असा उच्चार केला आहे.
हेही वाचा: Photo: सोनालीचा 'खण'खणीत लूक, खणाची पॅन्ट अन् क्रॉप टॉप
अमृताने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे अमृताने आपल्या नव्या प्रोजेक्टची माहिती दिली आहे. यामध्ये तिनं ती रंगभूमिवर परतली असल्याची खुशखबर चाहत्यांना दिली आहे.
अमृता सुभाष सध्या रंगभूमीवर परतली असून तिचं ‘पुनःश्च हनिमून’ हे नाटक नव्या जोमाने पुन्हा सुरु झालं आहे. चांगल्या आणि दर्जेदार नाटकांना अजूनही रसिक गर्दी करतात. सध्या रंगभूमीवर अशी अनेक नाटकं गाजताना दिसत आहेत. नाटकानंतर कलाकारांना आवर्जून भेटून भरभरून दाद देणारे रसिक भेटणं ही कलाकारांसाठी सर्वात मोठी पावती आहे. या गोष्टींची प्रत्यय अमृताची पोस्ट पाहिल्यावर येतो.
पुनःश्च हनिमून (Punashcha Honeymoon) या नाटकांच्या ठाण्याला झालेल्या प्रयोगानंतर तिला अनेक प्रेक्षक भेटायला आले होते. तेव्हा एका प्रेक्षकांनी तिच्या फोटोचं कोलाज बनवून आणलं होतं आणि ते तिला भेट म्हणून दिलं. अमृता त्या भेट्वस्तूवर आपली सही देताना दिसत आहे. या सुंदर क्षणाला एका रिलच्या माध्यमातून पोस्ट केलं आहे.
याला खास कॅप्शन देत ती असं लिहिते,”मायबाप प्रेक्षक .. मी कृतज्ञ आहे.. माझ्यावर आणि माझ्या कामावर असाच लोभ कायम असू द्यात..#पुनश्चहनिमून ❤” असे तिन तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच, ही आजवरची सर्वात चांगली भावना आहे.. तुमच्या कामावर प्रेम करणाऱ्या या अद्भुत आत्म्यांना तुम्हाला भेटायला मिळते ❤️ हे अनमोल आहे. अशी भावना अमृताने व्यक्त केली आहे.
हेही वाचा: ...म्हणून अथिया मोठ्या पडद्यापासून लांब आहे, अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा
अमृता सुभाषने ‘श्वास’, ‘सावली’, ‘वळू’, ‘त्या रात्री पाऊस होता’, ‘गंध’, ‘मसाला’, ‘चिंतामणी’, ‘रझाकार’, ‘किल्ला’, ‘झिपऱ्या’ या मराठी चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत.
अमृताने मराठी बरोबरच हिंदी चित्रपटातसुद्धा काम केले. झोया अख्तर दिग्दर्शित ‘गल्ली बॉय’ या चित्रपटात तिने रणवीर सिंहच्या आईची भूमिका साकारली. तसंच तिने अनुराग कश्यप यांच्या ‘चोक्कड’ चित्रपटातही काम केलेय. तसेच अमृताने सेक्रेड गेम्स या नेटफ्लिक्सच्या पहिल्या वेब सिरीजच्या दुसर्या सिझनमध्ये कुसुम देवी यादव ही व्यक्तिरेखा साकारली होती.
Web Title: Actress Amruta Subhash Special Reel For Her Audience
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..