
Ananya Panday: बहिणीच्या मेहंदी सेरेमनीमध्ये सिगारेट ओढताना दिसली अनन्या पांडे, फोटो होतोय व्हायरल
अभिनेत्री अनन्या पांडे मंगळवारी चुलत बहीण अलाना पांडेच्या मेहंदी सेरेमनीमध्ये दिसली. मेहंदी सेरेमनीचे इनसाइड फोटोज सोशल मीडियावर चर्चेत आहेत. दरम्यान, अनन्या पांडेचा धूम्रपान करतानाचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. अनन्या तिच्या बहिणीच्या मेहंदी सेरेमनीमध्ये सिगारेट ओढताना दिसली आहे.
मात्र, ज्या अकाऊंटवरून हा फोटो पोस्ट करण्यात आला होता ते आता डिलीट करण्यात आले आहे. पण याच दरम्यान या पोस्टचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. युजर्स अनन्याला ट्रोलही करत आहेत.
अनन्याने तिच्या बहिणीच्या मेहंदी सेरेमनीमध्ये बेबी पिंक स्कर्ट आणि एक स्ट्रॅप क्रॉप टॉप घातला होता. तिने या लुकला मिडल पार्टेड हेअरस्टाइल आणि न्यूड मेकअपसह पूरक केले. या लूकमध्ये ती खूपच गोंडस दिसत होती. फोटोमध्ये अनन्याच्या आजूबाजूला पाहुणे दिसत आहेत आणि ती एका कोपऱ्यात धूम्रपान करताना दिसत आहे.
सोहेल खानच्या घरी हा मेहंदी सोहळा पार पडला. या कार्यक्रमात सलमान खानची आई सलमा खान आणि हेलनही पोहोचल्या होत्या. सलमानची बहीण अलविरा अग्निहोत्री आणि अतुल अग्निहोत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
अभिनेता बॉबी देओलही पत्नीसोबत पोहोचला. अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप देखील या फंक्शनचा एक भाग होती.
या सोहळ्यापूर्वी अलानाचे ब्राइडल लंच आयोजित करण्यात आले होते. या लंचची थीम व्हाइट कलर होती. अनन्या पांढऱ्या रंगाच्या वन पीसमध्ये दिसली. तिने आपला लूक साधा ठेवला होता.
आजकाल अनन्या पांडेही तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. तिचे नाव अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत जोडले जात आहे. त्यांच्या अफेअरच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होत्या.
अलीकडेच, दोघांनीही लॅक्मे फॅशन वीकच्या ग्रँड फिनालेमध्ये मनीष मल्होत्रासाठी एकत्र रॅम्प वॉक केला होता. अनन्याने आदित्यसोबतचे अनेक फोटोही शेअर केले होते. मात्र, अनन्या किंवा आदित्य या दोघांनीही अशा अफवांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.