'अक्कड बक्कड बंबे बो, पेट्रोल डीजल नब्बे पेट्रोल सौ'

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 18 February 2021

सातत्यानं पेट्रोल डिझेलच्या वाढणा-या किंमती यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

मुंबई - देशात सध्या कळीचा मुद्दा झालेल्या पेट्रोल प्रश्नावर नागरिक हैराण झाले आहेत. दिवसेंदिवस पेट्रोलचे वाढणारे दर यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चाट पडत आहे. त्याबद्दल अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यात प्रख्यात अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी सोशल मीडियावर डिझेल आणि पेट्रोल दरवाढीवर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या ती मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.

देशाच्या काही भागांमध्ये पेट्रोलनं 100 चा टप्पा पार केला आहे. पेट्रोल 100 रु. प्रति लिटर अशा दराने मिळत आहे. सातत्यानं पेट्रोल डिझेलच्या वाढणा-या किंमती यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यांच्याकडूनही सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांवर टीका होताना दिसत आहे. उर्मिला मातोंडकर यांनी मात्र त्यांच्या वेगळ्या अंदाजात या दरवाढीवर टीका केली आहे. त्यांनी व्टिट करताना म्हटले आहे की, 'अक्कड़ बक्कड़ बंबे बो, डीजल नब्बे पेट्रोल सौ, सौ मे लगा धागा, सिलेंडर ऊछल के भागा'  तिच्या या प्रतिक्रियेला नेटक-यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.

अशाप्रकारे प्रतिक्रिया देण्याची उर्मिला यांची ही काही पहिलीच वेळ नाही.  हरियाणातील कृषी मंत्री जेपी दलाल यांनी 200 शेतक-यांच्या मृत्युवर प्रतिक्रिया दिली होती. त्याला उत्तर देताना उर्मिला म्हणाल्या होत्या, जे लोक शेतक-यांना खलिस्तानी आणि देशद्रोही म्हणत आहेत त्या हरियाणाच्या कृषीमंत्र्यांच्या असंवेदनशील अशा वक्तव्यावर काय म्हणणे आहे. तसेच बॉलीवूडमध्ये काही दिवसांपूर्वी नेपोटिझमवरुन चाललेल्या वादातही उर्मिला यांनी उडी घेतली होती. त्यावर त्यांनी परखडपणे आपली भूमिका मांडली होती. त्या मुद्दयाबद्दल म्हणाल्या होत्या, ज्यावेळी सोशल मीडिया नव्हता तेव्हा काही निवडक माध्यमांचा वापर केला जात होता. अशावेळी ती माध्यमं एखाद्या माफिय़ापेक्षा कमी नव्हती. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

पंजाबमधील रस्त्याला सोनूच्या आईचे नाव; रात्री दीड वाजता सांगितली आठवण

उर्मिला म्हणाल्या, मीडियानं ज्यावेळी माझ्या चित्रपटांविषयी काही लिहिलं नाही. मात्र माझे 11 चित्रपट फ्लॉप झाले ते मोठ्या अक्षरात छापले गेले. उर्मिला यांच्या राजकीय प्रवासाविषय़ी सांगायचे झाल्यास त्यांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणूकीत कॉग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र पाच महिन्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.  
 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress and politician Urmila matondkar reaction on petrol diesel price hike tweeted akkad bakkad bambey bo