Ashok Saraf: अशोक मामा आणि अश्विनी भावेचा एकत्र फोटो पाहून निवेदिता ताईंनी केली वेगळीच बनवाबनवी; म्हणाल्या.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress ashvini bhave shared photo with ashok saraf and nivedita saraf gives funny comment on it

Ashok Saraf: अशोक मामा आणि अश्विनी भावेचा एकत्र फोटो पाहून निवेदिता ताईंनी केली वेगळीच बनवाबनवी; म्हणाल्या..

Ashwini Bhave shared photo with ashok saraf : अशोक सराफ आणि अभिनेत्री अश्विनी भावे ही जोडी एकत्र आली की प्रत्येकाला आठवतो तो 'बनवाबनवी' चित्रपट. अशोक मामा आणि अश्विनी ताई यांच्या भन्नाट केमिस्ट्रीने सजलेला हा चित्रपट आजही कुणीच विसरू शकलेलं नाही.

या चित्रपटाततील अश्विनी भावे यांची लिमहू कलरची साडी ही अशोक सराफ यांच्यामुळे चांगलीच गाजली. अजरामर अशा या चित्रपटातील एक दोन दिग्गज कलाकार बऱ्याच वर्षांनी एकत्र आले आहेत.

अभिनेत्री अश्विनी भावे यांनी अशोक मामांसोबतचा एक फोटो शेयर केला असून या फोटोची बरीच चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनी या फोटोवर एक भन्नाट कमेंट केली आहे, जी बरीच व्हायरल झाली आहे.

(actress ashwini bhave shared photo with ashok saraf and nivedita saraf gives funny comment on it)

अभिनेत्री अश्विनी भावे सध्या भारतात आल्या असून नुकतेच त्यांनी अशोक सराफ आणि  निर्मिती सावंत यांचे 'व्हॅक्युम क्लिनर' हे नाटक पाहिले. अश्विनी भावे यांनी  सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन व्हॅक्युम क्लिनर या नाटकाचं कौतुक केलं. सोबतच अश्विनी भावे यांनी अशोक सराफ  यांच्यासोबतचा एक खास फोटो देखील शेअर केला.

''नुकतच मी 'व्हॅक्युम क्लिनर' हे नाटक पाहिलं. मला हे नाटक खूप आवडलं. कॉमेडी क्विन निर्मितीनं खूप छान काम केलं आहे. तर अशोक सराफ यांची या नाटकातील एनर्जी आणि आर्तता पाहून मी भारावले आहे.'' अशी पोस्ट अश्विनी भावे यांनी शेयर केली आहे.

तर या फोटोला अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनी मात्र एक भन्नाट कमेंट करत सगळ्यांचच लक्ष वेधलं आहे.

अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी या फोटोवर मिश्किल कमेंट केली आहे. 'त्यांनी लिंबू कलरचा शर्ट घातला आहे.' असं निवेदिता सराफ अशोक मामांना उद्देशून म्हणाल्या आहेत. निवेदिता सराफ यांची कमेंट सर्वांनाच खूप भावली आहे.

यावर नेटकऱ्यांनी देखील अनेक कमेंट केल्या आहेत. एका युझरनं म्हंटलं आहे की, 'अश्विनी मॅडम यांनी आज लिंबू कलरची साडी नाही  पण अशोक मामा यांनी लिंबू कलर चा शर्ट घातलाय.' तर एकाने 'मिस्टर माने' अशी कमेंट केली आहे.