अभिनेत्री बिना अँटोनीला कोरोना, रुग्णालयात दाखल

मनोजनं त्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की,
actress bina
actress bina Team esakal

मुंबई - दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री बिना अँटोनीला (Actress Beena )कोरोनाची (testing positive) लागण झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती तिचा पती मनोजनं एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन दिली आहे. त्यानं त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मल्याळम टिव्ही क्षेत्रातील प्रख्यात अभिनेत्री म्हणून तिनं वेगळी ओळख निर्माण केली आहे.

बिनीचा पती अभिनेता मनोजनं (Manoj) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन बिनीविषयी माहिती दिली आहे. बिनीला सध्या उपचारासाठी एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती संबंधित डॉक्टरांनी दिली आहे. मनोजनं जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात तो कमालीचा भावनाशील झाला आहे. त्यानं अश्रु आवरत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

actress bina
'रुके न तू, झुके न तू'; वडिलांची कविता म्हणत बिग बींनी दिली प्रेरणा
actress bina
वेगळं वळण ः या कारणाने झाला त्या चिमुरडीचा मृत्यू.... त्या खोलीत कोणकोण होतं...

मनोजनं त्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, हे सगळ्या परिस्थितीचा स्वीकार करणं हे मला करावं लागणार आहे. याचे कारण वेळ बिकट आहे. ती सध्या सेल्फ क्वॉरनटाईन आहे. तिला काळजी घ्यायला सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी तिची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे तिला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं आहे. मात्र आता ती व्यवस्थित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com