हिच्यामुळे झाले विकी कौशल आणि हरलीन सेठीचे ब्रेकअप

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 March 2019

बी-टाऊनमध्ये अभिनेता-अभिनेत्रींची जवळीकता आणि ब्रेकअप या गोष्टी लपून राहत नाही. विकी आणि भूमी पेडणेकरची जवळीकताही लपून राहीलेली नाही.

'उरी' स्टार विकी कौशलचे करिअर सध्या जोरात सुरु आहे. 'मसान' फेम अभिनेता म्हणून ओळखला जाणारा विकी आज 'उरी' स्टार म्हणून ओळखला जात आहे. 'उरी' चित्रपटाच्या भरघोस यशानंतर विकीचे बॉलिवूडमधील भाव वाढले आहेत. त्याच्या अभियनाचे कौतूक केवळ त्याचे फॅन्सच नाही तर बॉलिवूडमध्येही होत आहे. पण आपल्या प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर असलेल्या विकीच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र सगळंकाही नीट नाही. 

काही दिवसांपूर्वीच विकीची गर्लफ्रेंड हरलीन सेठी हिने त्याला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले. यावरुन त्यांचे ब्रेकअप झाले असल्याचे बोलले जात आहे. बी-टाऊनमध्ये अभिनेता-अभिनेत्रींची जवळीकता आणि ब्रेकअप या गोष्टी लपून राहत नाही. विकी आणि भूमी पेडणेकरची जवळीकताही लपून राहीलेली नाही. या जवळीकतेमुळेच हरलीन आणि विकीच्या नात्याला ग्रहण लागले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. करण जोहरने 'तख्त' या चित्रपटासाठी विकी आणि भूमीला साईन केले आहे. याशिवाय एका हॉरर चित्रपटातही ही जोडी एकत्र दिसेल. 
 

vicky and bhumi


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress bhumi pednekar might be a reason for harleen sethi and vicky kaushals break up