
सोशल मीडिय़ावर तिनं आता बिकीनी फोटो शुट केले आहे. ते कमालीचे हॉट आहे.
मुंबई - अभिनेत्री बिदिता बागची गोष्टच वेगळी आहे. ती जे काही करते त्यातून फॅन्सचं लक्ष वेधून घेण्याची कला तिला साधली आहे. सोशल मीडिय़ावर तिनं आता बिकीनी फोटो शुट केले आहे. ते कमालीचे हॉट आहे. त्याला चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. हजारोच्या संख्येनं लाईक्स आणि कमेंटस मिळाल्या आहेत.
* बिदितानं जे फोटोशुट केलं आहे त्यात तिनं सर्वाधिक हॉट फोटोशुटवर भर दिला आहे. बॉलीवूडमध्ये एक धाडसी अभिनेत्री म्हणून बिदिताकडे पाहिले गेले आहे.
* प्रसिध्द अभिनेता नवाझुद्दिन सिध्दिकी याच्याबरोबर तिनं बंदुकबाज बाबुमोशाय चित्रपटातून पदार्पण केले आहे.
* बिदिता सोशल मीडियावर सातत्यानं अॅक्टिव्ह असते. चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे हेही तिच्या व्यक्तिमत्वाचे वेगळे वैशिष्ट् म्हणावे लागेल.
* सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मादक फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती अॅक्टिव्ह असल्याचे दिसून आले आहे.
* बिदितानं काही दिवसांपूर्वी शेतक-यांसाठी एक गाणे म्हटले आहे. त्यालाही चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
* त्याविषयी ती म्हणाली होती की, भारत हा कृषीप्रधान देश आहे. अद्यापही या देशात शेतक-यांच्या आत्महत्या होताना दिसतात. ते चूकीचे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत आणि त्यांच्याकडे कुणाचेही लक्ष जात नाही हे चूकीचे म्हणावे लागेल.
* आपल्या बिकीनी फोटोविषयी तिनं सांगितले की, बिकिनीनं मला कधीही आकर्षित केलं नाही. त्यामुळे मी साडी परिधान करण्याची एक अनोखी पद्धत शोधून काढली आहे.
* बिदिताने या फोटोंमध्ये साडीचा वापर बिकिनीप्रमाणे केला आहे.