सुष्मिताच्या भावाचा संसार धोक्यात ! बायकोनं मागितला घटस्फोट

परत एकदा प्रसिद्ध अभिनेत्री चारू असोपा आणि सुष्मिता सेनचा भाऊ यांच्या घटस्फोटाची बातमी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
Charu Asopa and Rajeev Sen divorce case
Charu Asopa and Rajeev Sen divorce caseesakal

परत एकदा प्रसिद्ध अभिनेत्री चारू असोपा (Charu Asopa) आणि सुष्मिता सेनचा भाऊ यांच्या घटस्फोटाची बातमी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.(TV Actress)नवरा बायको एकमेकांवर गंभीर आरोप करत अखेर घटस्फोटाच्या निर्णयावर पोहोचले आहेत.याआधीही या दोघांत टोकाचे वाद झाले होते.मात्र यावेळी या दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत.

यावेळी चारू असोपाने तिचं पहिलं लग्न लपवल्याचा आरोप राजीवने तिच्यावर केलाय.तर दुसरीकडे 'राजीवला अनेक संध्या देऊनही आमच्यातले वादविवाद कायम आहे मग अश्या नात्यात राहून तरी काय करू',असे म्हणत चारूनेही राजीवला सोडण्याचा निर्णय घेतलाय.चारू असोपाने घटस्फोटाचा तसा नोटीसही राजीवला पाठवलाय.याबाबतची माहिती चारूने स्वत: मीडियाला दिली आहे.

२०१९ मधे चारू असोपा आणि राजीव सेन यांचं लग्न झालं होतं.खरं तर लग्नानंतर एका वर्षातच या जोडप्यात लहानसहान गोष्टींवरून वादाला सुरू झाली होती.मात्र यांच्यातील वाद आता इतक्या टोकाला जाऊन पोहोचले आहेत की आता दोघांनीही घटस्फोट (Divorce) घेण्याचा निर्णय घेतलाय.

राजीवने एका मुलाखतीत चारूचं एक सिक्रेटही मीडियापुढे मांडलंय.राजीवच्या मते चारूने तिच्या पहिल्या लग्नाबाबतचं सत्य सगळ्यांपासून लपवलं.अर्थात चारूने राजीवला लग्नाआधी तिच्या पहिल्या लग्नाबाबत काहीही सांगितलं नाही.याऊलट चारू म्हणते, 'लग्नाचे तीन वर्ष कसे गेले ते कळलंच नाही.आमच्या नात्यात काहीही उरलेलं नाही.आणि माझ्या मुलीला मी अश्या भांडणाच्या वातावरणात वाढवू शकत नाही.त्यामुळे मी राजीवला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com