बघा, बघा लाल साडीत नवरी आली; दियाचे मेहंदीचे फोटो व्हायरल 

actress dia mirza Vaibhav rekhi wedding first pictures of actor in stunning bridal ensemble arrive online
actress dia mirza Vaibhav rekhi wedding first pictures of actor in stunning bridal ensemble arrive online

मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झानं सोमवारी तिचा बॉयफ्रेंड वैभव रेखी सोबत लग्न केले. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दियाच्या चाहत्यांनी तिला यानिमित्तानं मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटसचा पाऊस पडला आहे. दियाचे नवरीच्या वेषातील काही फोटो प्रसिध्द झाले आहेत. रेड कलरची साडी घालून दियानं लग्न मंडपात पाऊल टाकले असून त्यात ती सुंदर दिसते आहे.

दियाच्या त्या फोटोंना मोठ्या प्रमाणावर लाईक्स मिळाले आहेत. तिचा जो फोटो आहे त्यात दिया मिर्झा आपल्या अपार्टमेंट मधून लग्नस्थळी जाताना दिसत आहे. याबरोबरच दियाच्या मेहंदीचेही फोटो यापूर्वी व्हायरल झाले होते. त्यातील एक फोटो मलायका अरोरोनंही व्हायरल केला होता. दिया मिर्झानं व्हाईट कलरचा गाऊन परिधान केला होता. तसेच साखरपुड्याच्या अंगठीचा फोटो सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय होता.

काही दिवसांपूर्वी दिया मिर्झा आणि वैभव रेखी यांचं लग्नाच्या अगोदर एक छोटेसे सेलिब्रेशन झाले. ज्यात फक्त घरातील माणसांचा सहभाग होता. तसेच काही जवळचे मित्रही यावेळी उपस्थित होते. या फोटोंनाही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसिध्दी मिळाली होती. शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीनंही दियाच्या या समारंभाचे फोटो शेयर केले होते. तिनं लिहिले होते की, आमची क्रेझी फॅमिली तुमचे स्वागत करत आहे. दिया आम्ही सर्वजण तुझ्यावर खूप प्रेम करतो. पिंकविलानं दिलेल्या माहितीनुसार दियाच्या लग्नाला मलायका अरोरा, राजकुमार हिरानी येण्याची शक्यता आहे.

2019 मध्ये दियानं साहिल बरोबर घटस्फोट घेतला होता. त्यावेळी दियानं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती त्यात ती म्हणते, आम्ही आता वेगळे होत आहोत. मात्र आमच्यातील संवाद नेहमीच सुरु असेल. कायद्याच्या दृष्टीनं आम्ही वेगळे झालो असलो तरी भविष्यात नेहमी चांगले मित्र राहू.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com