सोन्याचे घड्याळ आणि चांदीची चप्पल वापरते हि २२ वर्षीय अभिनेत्री, दुधाने करते अंघोळ !  

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

दिगांगना तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. तिचा जन्म १५ ऑक्टोबर १९९७ रोजी झाला होता. तिच्या कुटुंबातील सर्व सदस्य तिच्यावर खूप प्रेम करतात आणि तिला आजही राजघराण्याप्रमाणे सुखसोईमध्ये ठेवतात.

मुंबई : जगामध्ये असे अनेक कमनिशिबी लोक आहे जे बरीच वर्षे कष्ट आणि मेहनत करून देखील श्रीमंत बनू शकत नाहीत. यांचे संपूर्ण आयुष्य हे तंगीमध्ये व्यतीत होते. याशिवाय काही असे लोक आहे जे नशिबाचे धनी असतात आणि त्यांचा जन्म होताच ते अरबो, करोडोंचे मालक बनतात. गरिबी काय असते हे त्यांना ठाऊकच नसते. दिगांगना सूर्यवंशी ही अभिनेत्री अशाच एका कुटुंबातून आली आहे.

Image result for actress digangana suryavanshi hot hd images

दिगांगना तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. तिचा जन्म १५ ऑक्टोबर १९९७ रोजी झाला होता. तिच्या कुटुंबातील सर्व सदस्य तिच्यावर खूप प्रेम करतात आणि तिला आजही राजघराण्याप्रमाणे सुखसोईमध्ये ठेवतात. बॉलीवूडमध्ये आल्यानंतरही दिगांगना आपल्या परंपरा विसरली नाही. आजही तिचा शाही थाट एखाद्या बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षा काही कमी नाही.

चित्रडोसा : रजनीकांत यांच्या सुपर रहस्याचा शोध… 

Image result for actress digangana suryavanshi hot hd imagesतिच्या बालपणाबद्दल बोलायचे झाले तर, जेव्हा दिगांगना अवघ्या १० वर्षांची होती त्यावेळी तिने आपल्या वडिलांकडून सोन्याच्या घड्याळाचा आग्रह धरला होता आणि तिचा हा आग्रह तिच्या वडिलांनी पूर्ण देखील केला होता आणि तिला सोन्याचे घड्याळ दिले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Hum sabhi ki oor se app sabhi ko Deepawali parv ki shubhkamnaye

A post shared by Digangana Suryavanshi (@diganganasuryavanshi) on

याशिवाय दिगांगनाच्या प्रत्येक वाढदिवशी तिला दुध आणि पाण्याने अंघोळ घातली जाते आणि वाढदिवशी दिगांगना एखाद्या राजकुमारी सारखी तयार होऊन आपला वाढदिवस साजरा करते.

दिगांगनाकडे दागदागिन्यांची काही कमी नाही. तिची खोली फक्त तिच्या स्वत:च्या वस्तुनेच भरलेली आहे. तिच्याजवळ सोन्याचांदीचे अनेक दागिने आहेत. आपल्या प्रत्येक वाढदिवशी दिगांगना चांदीची चप्पल घालते. तिच्या कुटुंबातील तिला एखाद्या राजकुमारी असल्यासारखे भासावे म्हणून हे सर्व करत असतात.

दिगांगनाने २००२ मध्ये टीव्ही सिरीयल क्या हादसा क्या हकीकत मध्ये एक बालकलाकार म्हणून काम केले होते. स्टार प्लस वरील सिरीयल एक वीर की अरदास वीरा मध्ये तिने पहिल्यांदा मुख्य भूमिकेमध्ये काम केले ज्यामुळे टीव्ही इंडस्ट्रीमध्ये ती खूपच फेमस झाली होती. याशिवाय बिग बॉस ९ मध्ये सुद्धा ती आपल्याला पाहायला मिळाली होती.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress digangana suryavanshi silver sandal and gold clock in marathi