शेवटी बाईपण सोडून 'पुरुष'  व्हावं लागलं, कित्येक वर्षांपासून होती त्रस्त 

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 2 December 2020

अखेर तिनं आपल्यातील उणेपणाला जगासमोर आणताना अखेर लिंगपरिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणला.

मुंबई - जगाला नावं ठेवायला काय जाते त्यांना मला काय त्रासातून जावे लागले याबद्दल कुणाला कसलीच माहिती नाही. कोणाचीही भीड न ठेवता जे वाटत आले त्याबद्दल बोलत गेले. व्यक्त होत राहिले. शेवटी मला ज्या निर्णयावरुन ट्रोल करण्यात आले तो निर्णय मी घेण्याचा विचार केला. हे शब्द आहेत प्रसिध्द अभिनेत्री एलन पेजचे. तिनं अखेर एक धाडसी निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणला.

एलनने असे काय केलं हे आताच्या घडीला कुणी काही विचारले तर सांगावे लागेल की, ती बाई होती आणि आता ती तिच्या बायकोसाठी पुरुष झाली आहे. तिनंच याबद्दलची अधिक माहिती सोशल मीडियावर शेयर केली आहे. त्यासंबंधी एक भली मोठी पोस्ट चाहत्यांसाठी लिहिली आहे. याविषयी अधिक माहिती देताना एलनने असे म्हटले होते की, आता अशाप्रकारच्या लपाछपीला कंटाळले आहे. का म्हणून मी हे सर्व सहन करु. मला कळतच नाही माझं आयुष्य जे की माझं आहे ते लोकं मला का जगु द्यायला तयार नाहीत. त्यांना काय अडचण आहे ज्यामुळे ते माझ्यामागे लागले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून एलनला तिच्यातील बदलत्या शाररीक हार्मोन्समुळे मोठ्या परिणामाला सामोरं जावं लागलं होतं. अखेर तिनं आपल्यातील उणेपणाला जगासमोर आणताना अखेर लिंगपरिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणला. मी नेहमीच लोक काय म्हणतील याला घाबरुन राहिले त्याने माझे नुकसान झाले. याचा विचार कुणी केला नाही. माझ्या शाररिक आणि मानसिक आरोग्याचा विचार कुणी केला नसल्यानं शेवटी मला काय आवड़ते यानुसार मी निर्णय घेतला आहे. आणि त्यावरुन कुणाला वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाही.

Image

एलननं सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून जी माहिती दिली आहे त्यात ती म्हणाली आहे की, माझं नाव अॅलन नसून एलियॉट पेज आहे. तुम्ही मला स्त्री म्हणा किंवा पुरुष मला फरक पडत नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ellen Page (@ellenpagestar)

मी तेच केलं जे मला करायचं होतं. एक्स मेन, इन टू द फॉरेस्ट, इन्सेप्शन, जुनो यांसारख्या  चित्रपटांमध्ये तिनं काम केलं आहे. गेल्या तीन वर्षांपासून एलन एमा पोर्टनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. अलिकडेच तिने आपल्या प्रेयसीसोबत लग्न केलं. पत्नीच्या प्रेमाखातर मी लिंग देखील बदलू शकते असं तिनं  एका मुलाखतीतून सांगितले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress Ellen Page comes out as transgender changes name to Elliot